आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कोणीही आमदारकीचे स्वप्न पाहू नका, आमदार शिवाजी कर्डिलेंची विरोधकांना कोपरखळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - तालुक्यात दीड वर्षात आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माझ्या पेक्षा जास्त कामे केली. ते पंचवीस वर्षे हटणार नाही. आता कोणीही आमदारकीचे स्वप्न पाहू नका, अशी कोपरखळी आमदार शिवाजी कर्डिले यांनी विरोधकांना लगावली.

घोडेगाव येथील मारूती मंदिर सभामंडप रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या भुमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे होते. व्यासपीठावर सचिन देसरडा, शिंगणापंूर देवस्थानचे विश्वस्त बापुतात्या शेटे, दत्ता लोहकरे, भाजप तालुकाध्यक्ष मावली पेचे, दिलीप मोटे, शिवसेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार, बाळासाहेब बोरूडे, कृष्णा तांदळे आदी उपस्थित होते. आमदार कर्डिले म्हणाले, तालुक्यात गाव जोडणारे रस्ते, तर होणारच आहेत. परंतु वाड्या वस्त्यावर देखील रस्त्यांची कामे राज्याच्या केंद्राच्या मदतीने पूर्ण करू. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तालुके दुष्काळमुक्त होतील. करजगावसह १८ गावांची पाणी योजना मंजुरी माझ्या काळातच मंजूर झाली आहे. मात्र त्याचे श्रेय विरोधकच घेत आहे. समन्यायी पाणी वाटप कायदा आघाडी सरकारच्या काळातच झाल्यामुळे आपल्या हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. मुरकुटे म्हणाले, एमआयडीसीच्या माध्यमातून येथे विविध कंपन्या आणून उद्योग धंद्याचे जाळे वाढवणार आहे. घोडेगाव येथे ग्रामीण रूग्णालयाची मंजुरी मिळाली आहे. यावेळी उपसरपंच पारस चोरडिया, पंकज लांबहाते, मनोज बोरूडे,दिलीप काळे,प्रमोद पेहर, किशोर विखे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...