आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Notebook Production, Latest News In Divya Marathi

दज्रेदार आणि स्वस्त वह्या निर्मितीचा अनोखा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कागदाच्या घड्या करण्यात रमलेले तरुण हात, वह्यांचे गठ्ठे उचलून वाहणारे सक्षम युवा खांदे, पाड्या-वस्त्यांवर वह्या पोहोचवण्यासाठी सरसावलेली तरुणाई.. हे चित्र आहे ‘स्मायलिंग अस्मिता’च्या वह्या निर्मितीच्या कट्टय़ावरच्या कारखान्याचे. 20-30 तरुणांनी एकत्र येऊन रिकाम्या वेळेत काही, तरी विधायक काम करावे म्हणून स्वस्त वह्या निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे. बघता बघता या वह्या राज्यातील 14 जिल्ह्यांत पोहोचल्या आहेत.
आशुतोष लहारे, यशवंत तोडमल, शुभम मिसाळ, महेश सोनवणे, भूषण तोडमल, अक्षय घोरपडे, विशाल गरड, तरुणा पानसरे, विशाखा पोखरकर आदी मंडळी स्वस्त, पण दज्रेदार वह्या निर्मितीच्या कामात सध्या व्यग्र आहेत. इतर नामवंत ब्रॅण्डच्याच कागदात सर्वात स्वस्तात वह्या देताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे सर्व करताना संजीव भोर, एम. एम. तांबे, विलास लांडे, सुधाकर बोरकर आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असते, असे या युवकांनी नमूद केले. कलाकार यशवंत तोडमल व अमोल बागूल यांच्या प्रयत्नांतून संस्थेमार्फत लवकरच जगातील सगळ्यात मोठय़ा वहीची निर्मिती केली जाणार आहे.

राज्यातील अनेक शाळांतील गुणी, गरीब मुलांना लाखभर वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. रॅगिंग, राष्ट्रभावना जागृती, गरजू गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण याबाबत स्मायलिंग अस्मिता राज्यात काम करत आहे. लेखीकामाच्या वह्यांबरोबरच चित्रकलेच्या वह्यांचीही निर्मिती संस्थेमार्फत केली जाते. अधिक माहिती व सहकार्यासाठी स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, महिला बचत गट यांनी यशवंत तोडमल 9552758987 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.