आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावांचे आराखडे तयार करा : जिल्हाधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गावेही भविष्यातील शहरे आहेत, असे समजून ग्रामविकासाचे आराखडे तयार करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
आमदार बाळासाहेब मुरकुटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, सुरेखा कदम, सुरेखा राजेभोसले, जिल्हा नियोजन अधिकारी शिरीष वरसाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, जिल्हा प्रकल्प अधिकारी नितीन कापडणीस, जिल्हा रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी ब्रिजेश निमगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक एस. एम. सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. कवडे म्हणाले, आजची खेडी हळूहळू मोठी होत आहेत. ग्रामीण भागाचा विकास आराखडा करताना घनकचरा, सांडपाणी, पाण्याची बचत, पाण्याचा पुनर्वापर यासारख्या बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. या आराखड्याच्या माध्यमातून गावाला विकासाची दिशा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.