आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Notice To Six Employee In Education Department At Ahmednagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगरात शिक्षण विभागातील 6 कर्मचार्‍यांना नोटिसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कार्यालयीन वेळेत जागेवर न आढळलेल्या सहा कर्मचार्‍यांना शिक्षण अधिकारी दिलीप गोविंद यांनी सोमवारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून दोन दिवसांत खुलासा मागवला आहे. कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरणार्‍या कर्मचार्‍यांना चाप लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा परिषदेतील कर्मचारी कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महिनाभरापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी फतवा काढला होता. कर्मचारी कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरताना आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यात म्हटले होते.

सोमवारी उपाध्यक्ष मोनिका राजळे, सदस्य संभाजी दहातोंडे, शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयाची पाहणी केली असता, सहा कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळले. हा प्रकार गंभीर असल्याने राजळे यांच्या आदेशावरून तातडीने संबंधित सहा कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या. विस्तार अधिकारी आर. एम. पठाण, कर्मचारी के. आर. जाधव, वाय. डी. वारुळे, बी. व्ही. काळे, एम. सी. जेधे व सर्व शिक्षा अभियान विभागातील एका कर्मचार्‍याला नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.