आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी-पुरावे आल्यानंतर पाप्याविरुद्ध कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-जिल्हा न्यायालयात गोंधळ घालणारा कुख्यात गुंड पाप्या शेखविरुद्ध साक्षी-पुरावे आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांनी दिली.

पाप्या सध्या कारागृहातच आहे. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, पोलिस कर्मचारी शिवाजी रोहोकले यांनी दिलेल्या फिर्यादीत वकिलांनी कोणताही जबाब नोंदवलेला नाही. या गुन्ह्यात दाखल फिर्यादीत जबाब देण्याचा निर्णय वकिलांनी बुधवारी घेतला होता. मात्र, तसा कोणताही जबाब घेण्यात आलेला नाही, तसेच जीवे मारण्याचा प्रयत्‍न केल्याची तक्रार आली नसल्याचे हानपुडे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा न्यायालयात वकिलांमधील मतभेद गुरुवारी समोर आले. दुपारी एक वाजता बैठक असल्याची सुचना फलकावर देण्यात आली होती. मात्र, वकील संघाचे अध्यक्षांनी या बैठकीबाबत कानावर हात ठेवले. तर अँड. शिवाजी डमाळे यांच्या नावे ही सुचना देण्यात आली होती. मात्र, अशी कोणतीही बैठक झाली नाही. वकील संघाच्या निवडणुकीमूळे हे मतभेद अधिक तीव्रपणे समोर आल्याची चर्चा वकिलांमध्ये होती.