आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर फेडरेशनच्या अध्यक्षपदी आदिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर-महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर फेडरेशनच्या अध्यक्षपदी अविनाश आदिक यांची, तर खजिनदारपदी डी. एम. निमसे यांची निवड झाली. काँग्रेस भवनात शनिवारी सकाळी राज्य साखर कामगार फेडरेशनच्या जनरल कौन्सिलच्या सभेत ही निवड झाली. राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष रामनाथ गरड अध्यक्षस्थानी होते.

माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्षाच्या जागेवर अविनाश आदिक यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांनी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे. सध्या ते अशोक एज्युकेशन सोसायटीचे सचिव, रामराव आदिक पब्लिक स्कूलचे अध्यक्ष, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत.

अविनाश आदिक म्हणाले, माजी खासदार गोविंदराव आदिक बबनराव पवार यांनी मोठ्या मेहनतीने साखर कामगार फेडरेशनची स्थापना केली. या दोघांनाही राज्यात देशात कामगारांचे नेते म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली. साखर कामगारांची वेतनवाढ, थकित वेतन, पगार कपात यासारखे अनेक प्रश्न आहेत. चळवळीत अनुभवींचे सहकार्य मार्गदर्शन घेऊन कामगारांच्या प्रश्नासाठी संघर्ष करू, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांचे सहकार्य घेऊ. यावेळी फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, रामनाथ गरड (वृद्धेश्वर), डी. एम. निमसे (मुळा), बबनराव धस (ज्ञानेश्वर), सुरेश जाधव (रानवड), अप्पा गावडे (राहुरी), सोमनाथ गडाख (निफाड), काकासाहेब लबडे (ज्ञानेश्वर) यांनी मनोगत व्यक्त केले. सुखदेव फुलारे यांनी आभार मानले.
बातम्या आणखी आहेत...