आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९७५ भूखंडांवर आता मनपाचा मालकीहक्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्याअनेक वर्षांपासून बेवारस पडलेल्या तब्बल ९७५ भूखंडांवर महापालिकेचे नाव लागले आहे. उर्वरित ५७० भूखंडांवर नाव लावण्याची कार्यवाही सुरू आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत निवृत्त तहसीलदार सर्जेराव शिंदे त्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे. नवीन भूखंडांचा शोध घेऊन त्यावरही मनपाचे नाव लावण्यात येणार आहे. शहरातील अनेक भूखंडांचा मालकी हक्क मिळाल्याने महापालिकेला भविष्यात उत्पन्नाचे स्त्रोत उभे करता येणार आहेत.
महापालिकेची स्थापना होऊन तब्बल बारा वर्षे उलटले, परंतु या कालावधीत मनपाने शहरातील मोकळ्या भूखंडांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली. मात्र, मागील तीन वर्षांपासून मनपाने या भूखंडांवर आपले नाव लावण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
त्यासाठी निवृत्त तहसीलदारांची मानधनावर नेमणूक करण्यात आली. तहसीलदार त्यांच्या पथकाने शहरात तब्बल एक हजार ५४५ भूखंड शोधून काढले. त्यापैकी ९७५ भूखंडांवर मनपाचे नाव लावण्यात आले आहे. उर्वरित ५७० भूखंडांवर नाव लावण्याची कार्यवाही सुरू आहे. शिवाय आणखी भूखंडांचा शोध घेण्याचे कामही तहसीलदार त्यांचे पथक करत आहे. जे भूखंड शोधण्यात आले, त्यात अनेक भूखंडांवर अतिक्रमण झालेले आहे. नाव लावण्याची कार्यवाही पूर्ण होताच या भूखंडांवरील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना मोठा चाप बसणार आहे. केडगावसह नागापूर- बोल्हेगाव या उपनगरांचा समावेश करून महापालिका स्थापन झाली.
उपनगरांमध्ये अनेक मोठे भूखंड होते, हे भूखंड गेल्या दहा-बारा वर्षांपासून बेवारस पडलेले होते. अनेक भूखंडांवर झाडेझुडपे वाढली आहेत, तर काहींवर परिसरातील नागरिक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. आता या भूखंडांवर मनपाचे नाव लागल्याने ते विकसित होणार आहेत. अनेक भूखंडांवर मनपाला लहान- मोठी उद्याने उभारता येणार आहेत. काही भूखंडांवर व्यावसायिक संकुले देखील उभारता येणार आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासह मनपाच्या तिजोरीतही भर पडणार आहे.

नवीन नगररचनाकार करणार प्रयत्न
नगररचनाविभागातील नगररचनाकार विश्वनाथ दहे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याने हे पद अनेक दिवस रिक्त होते. आता या पदावर नुकतीच राजेश पाटील यांची नेमणूक झाली आहे. त्यांची आतापर्यंतची कार्यपध्दती पाहता मनपाच्या नगररचना विभागाला निश्चितच शिस्त लागणार आहे. भूखंडांवर नाव लावण्याच्या कार्यवाहीत देखील ते पुढाकार घेणार आहेत.

७०० एकरांवर अद्याप मनपाचे नाव नाही
पिंपळगावमाळवी येथे असलेल्या सातशे एकर जमिनीवर अद्याप मनपाचे नाव लागलेले नाही. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून, तसेच जिल्हा प्रशासनाने आदेश देऊनही भूसंपादन विभागाने ही कार्यवाही केलेली नाही. शहरातील भूखंडांप्रमाणे या सातशे एकर जमिनीवर मनपाचे नाव लागले, तर महापालिकेला शेकडो एकर जागेचा मालकी हक्क मिळणार आहे.

निवृत्त तहसीलदार निमसे यांनाच श्रेय
भूखंडांवरनाव लावण्याची कार्यवाही करण्यासाठी मनपाने अनुभवी निवृत्त तहसीलदार सर्जेराव निमसे यांची नेमणूक केली आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षांत भूखंडांवर मनपाचे नाव लावण्याची कार्यवाही पार पाडली आहे. त्यांच्या या कार्यावर मनपाचे अधिकारी पदाधिकारी समाधानी आहेत. शिंदे यांच्या अनुभवामुळे भूखंडांवर नाव लावण्याची किचकट प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.
बातम्या आणखी आहेत...