आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनआरएचएम’ अंतर्गत 22.55 कोटींचा निधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 2013-2014 या वर्षासाठी 22 कोटी 55 लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. सर्वाधिक 14 कोटी खर्च माता बालक आरोग्य कार्यक्रमासाठी करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा गुरुवारी (26 सप्टेंबर) उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य स्वाती कानडे, अश्विनी भालदंड, सुनीता बनकर, डॉ. भगवान मुरूमकर, चित्रा बर्डे, मंदा भोसले, राहुल जगताप आदी उपस्थित होते.

एनआरएचएमअंतर्गत मंजूर झालेल्या साडेबावीस कोटींच्या निधीबाबत सभेत चर्चा झाली. सर्वाधिक 14 कोटी 19 लाखांचा निधी माता बालक आरोग्य कार्यक्रमासाठी खर्च करण्याचे ठरले. रुग्ण कल्याण समितीसाठी 7 कोटी 58 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. नियमित लसीकरण योजनेवर 77 लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन आहे. पैकी 50 टक्के निधी उपलब्ध झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत अनेक बांधकामे बंद करण्यात आली होती. आता पाऊस चांगला झाल्याने अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राजळे यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधे उपलब्ध नसल्यास रुग्ण कल्याण समितीने स्वनिधीतून खरेदी करावी. सध्या उपलब्ध असलेला निधी अपुरा असल्याने वाढीव निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा ठराव समितीच्या सभेत घेण्यात आला.