आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनआरएचएम’चे 887 कर्मचारी धास्तावले..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) एप्रिल 2014 पासून खासगी कंत्राटदारांमार्फत चालवण्यात येणार आहे, अशी जोरदार चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘एनआरएचएम’अंतर्गत कार्यरत असलेले सुमारे 887 कर्मचारी धास्तावले आहेत.

केंद्र सरकारमार्फत 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम राबवला जात आहे. या अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी व अधिकार काम करत आहेत. या योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचार्‍यांना नियमित शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या मागणीसाठी कंत्राटी अधिकारी व कर्मचारी महासंघाचा पाठपुरावा सुरू आहे. जून महिन्यात ‘एनआरएचएम’च्या कर्मचार्‍यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम झाला. याची दखल घेऊन सरकारने त्यावेळी भरभरून आश्वासने दिली होती, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यातच ‘एनआरएचएम’ खासगी कंत्राटदारामार्फत चालवण्यात येणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.

त्यामुळे या कार्यक्रमांतर्गत काम करणारे जिल्हाभरातील 887 कर्मचारी धास्तावले आहेत. खासगी कंत्राटदाराच्या हाताखाली काम करताना कामाचा ताण वाढण्याची भीती या कर्मचार्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे म्हणाले, खासगी कंत्राटदारामार्फत अभियान चालवण्याबाबत सरकारने कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. मात्र, तशी चर्चा झाल्याने कर्मचारी धास्तावले आहेत.