आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Adviser Prakash Shah Met Anna In Raelgansiddhi

ओबामांचे सल्लागार शहा यांनी घेतली राळेगणसिध्‍दीत अण्णांची भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे सामाजिक संस्थांविषयीचे सल्लागार प्रकाश शहा यांनी शुक्रवारी सायंकाळी राळेगणसिद्घी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली़. ही सदिच्छा भेट असल्याचे अण्णांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी सांगितले.
शहा यांनी यापूर्वीही
राळेगणसिद्घीत येऊन हजारे यांची भेट घेतली होती़ त्या भेटीनंतर शहा यांनी हजारे यांना ओबामा यांच्या भेटीचे निमंत्रण दिल्याच्या बातम्या प्रसिद्घ झाल्या होत्या. हजारेंशी तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा केल्यानंतर वावड्या थंडावल्या होत्या़ पंधरा दिवसांपूर्वी शहा यांनी हजारे यांच्या भेटीसंदर्भात राळेगणमधील अण्णांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यानुसार शुक्रवारी ते अमेरिकेतून मुंबईत व तेथून राळेगणसिद्घीत पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा व्यवस्थेचा मोठा फौजफाटाही होता़ शहा यांनी ट्रेनिंग सेंटरमधील खोलीत हजारे यांच्याशी तासभर चर्चा केली. हजारे यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करून वाढत्या वयाचा विचार करता तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.