आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Observing Defeat Points In Jamkhed Municipal Council Minister Ram Shinde

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करणार : मंत्री शिंदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लोकशाहीत जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधून त्यावर मी चिंतन करेन, असे सांगत विरोधकांना रोखण्यात आपण कमी पडलो, अशी कबुलीच पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या बैठकीनंतर शिंदे पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीस खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, भाऊसाहेब कांबळे, शिवाजी कर्डिले, भानुदास मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, कृषी अधीक्षक अंकुश माने, प्रांताधिकारी वामन कदम, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानात निवड करण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील गावांच्या यादीबाबत या बैठकीत चर्चा झाली.

नंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री शिंदे म्हणाले, जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. लोकशाहीत जनतेचा कौल महत्त्वाचा असतो. पराभवाची कारणे शोधावे लागतील. विरोधकांना रोखण्यास आपण कमी पडलो. निवडणुकीत दिलेले उमेदवार योग्यच होते, असेही ते म्हणाले.

गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानात २८९ गावांची निवड करण्यात आली होती. या अभियानातून वर्षभरात ३३ हजार ७७५ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला. या कामांवर १३२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१६-१७ या वर्षासाठी २६४ गावांची निवड या अभियानात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवार अभियान लोकप्रिय होत असून, आता योजनेतून नरेगा अंतर्गत कामे करण्यात येणार आहेत. येत्या पाच वर्षांत जिल्ह्यातील हजार ३२८ गावांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कृषी विभागाला धरले धारेवर
बैठकीसाठीउपस्थित असलेल्या अनेक आमदारांनी जलयुक्त कामाबाबत पालकमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. एजन्सीने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेता गावांची निवड केली. एजन्सीकडून शासनाची लोकप्रतिनिधींची दिशाभूल सुरु आहे, असा आरोप आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला. अन्य आमदारांनीही गावांच्या निवडीवरुन कृषी विभागाच्या वरिष्ठांना धारेवर धरले.

निधी खर्च केल्याने दोन नगरपालिकांना नोटिसा
नगर शहराजवळील वडगाव गुप्ता येथे दोन एकर जागेवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. अल्पसंख्याक नागरी सुविधा योजनांतर्गत विविध योजना राबवण्यात येतात. गेल्या चार वर्षांपासून अल्पसंख्याक नागरी सुविधा योजनेत नगरपालिकांना वर्षाला मिळणार दहा लाखांचा निधी खर्च केल्याबद्दल श्रीगोंदे पाथर्डी नगरपालिकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. राम शिंदे, पालकमंत्री.