आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दागिने चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर नातेवाइकांनी चिडवल्याचा राग येऊन आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (16 मार्च) सायंकाळी घडली. यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


रफिक जमादार शेख (18, नंदनवन नगर, बोल्हेगाव फाटा) याला महिलांचे दागिने धूम स्टाइलने चोरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. तोफखाना पोलिसांनी त्याला व त्याच्या वडिलांना शनिवारी दुपारी चौकशीसाठी बोलावले.

चौकशी झाल्यानंतर त्यांना परत सोडले. घरी गेल्यानंतर नातेवाइकांनी चोरटा म्हणून चिडवल्याचा राग येऊन रफिकने डास मारण्याचे ऑलआऊट हे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी रफिकविरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या जाचामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.