आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिकाऱ्यांनी पाणी योजनांबाबत गांभीर्याने काम करावे - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत आश्वी महसूल मंडळातील पाणी योजनांबाबत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. कनोली आणि पानोडी येथील योजनांसाठी शासनस्तरावर अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याचा सल्ला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला.
विखे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (२१ मे) शिर्डी विधानसभा मतदारसंघात असलेल्या संगमनेर तालुक्याच्या आश्वी महसूल मंडळातील गावांची टंचाई आढावा बैठक झाली. प्रांताधिकारी संदीप निचित, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी रेश्मा होजगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा परिषद सदस्य कांचन मांढरे, पंचायत समिती सदस्य सखुबाई सांगळे, डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे साखर कारखान्याचे संचालक अनिल भोसले, कैलास तांबे, रामभाऊ भूसाळ आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, आश्वी महसूल मंडळात सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. गावातील समस्यांचे आणि विकास प्रक्रियांचे काम सुरू असल्याने या गावांना विकासाचा नवा चेहरा मिळाला. ही वस्तुस्थिती असली तरी टंचाई परिस्थितीत ऐनवेळी कोणते प्रश्न समोर येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे या परिसरात नियोजनाअभावी कोठेही पाणी टंचाई निर्माण होणार नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्कतेने काम करण्याची आवश्यकता आहे. मागणीप्रमाणे शक्य तेवढ्या कमी कालावधीत टँकर उपलब्ध करुन द्या. शासन नावाच्या व्यवस्थेचे अस्तित्व जाणवत नसल्याने काही खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत आहे. हवालदिल झालेल्या जनतेला आधार देण्याचे काम कार्यकर्त्यांना करावे लागेल. टंचाई परिस्थितीवर शासकीय पातळीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती तहसीलदार घोरपडे आणि उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.

आश्वी येथील टंचाई आढावा बैठकीत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे. समवेत संदीप निचित, शरद घोरपडे, रेश्मा होजगे, सुधाकर बोराळे, कांचन मांढरे आदी. छाया: परेश कापसे.

पानोडी आणि कनोली योजना सुरू करा
गेल्याअनेक दिवसांपासून बंद असलेल्या पानोडी येथील पाणी योजनेचा गांभीर्याने विचार करावा लागेल. कनोली येथील पाणीयोजना पुर्णत्वासाठी राहिलेल्या त्रुटी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. महावितरणने शक्य तेथे जादा अश्वशक्तीचे रोहित्रे बसवण्याची गरज आहे. शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची भिती विखेंंनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...