आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेरा अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तेरापोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. यामध्ये काही दिवसांपूर्वीच बदली झालेले लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन पगार यांचाही समावेश आहे.
पोलिस निरीक्षक दिलीपकुमार वाघमारे यांना नियंत्रण कक्षातून जामखेड पोलिस ठाण्यात, पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांना कर्जत पोलिस ठाण्यात नेमणूक दिली. शनिशिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मंडले यांची नगर तालुका पोलिस ठाण्यात बदली झाली आहे, तर नगर तालुक्याचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक कैलास देशमाने यांची शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांची लोणी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच लोणी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले सहायक निरीक्षक नितीन पगार यांची उचलबांगडी करण्यात आली. पगार यांच्याकडे जिल्हा वाहतूक शाखेचा पदभार सोपवण्यात आला आहे.
जिल्ह्यात नव्याने आलेले नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक विकास घनवट यांना पाथर्डी पोलिस ठाण्यात मनोहर इडेकर यांना कर्जत ठाण्यात नेमणूक देण्यात आली. सहायक निरीक्षक अरुण परदेशी यांना जामखेड पोलिस ठाण्यात नेमणूक मिळाली आहे. लोणी पोलिस ठाण्यातील फौजदार दीक्षा लोखंडे यांची शिर्डी पोलिस ठाण्यात, तर लोखंडे यांच्याजागी शहर वाहतूक शाखेतील फौजदार भालचंद्र शिंदे यांची बदली करण्यात आली. संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील फौजदार शिवाजी साळवे यांची घारगाव ठाण्यात बदली करण्यात आली. सर्व अधिकाऱ्यांनी त्वरित बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे, असेही पोलिस अधीक्षकांनी आदेशात नमूद केले आहे.

मोठी "किंमत' मोजली
सहायक निरीक्षक नितीन पगार यांची काही दिवसांपूर्वीच लोणीला बदली झाली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वर्तमानपत्रात शुभेच्छा देणारी जाहिरात दिली. जाहिरातीत सपोनि पगार यांच्यासह पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांचाही फोटो होता. याची उलटसुलट चर्चा सुरु झाली. सामाजिक कार्यकर्ते अॅड. श्याम असावा यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यामुळे पगार यांची चौकशीही सुरु होती. या प्रकाराचीच पगार यांना मोठी "किंमत' मोजावी लागली, अशी चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...