आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Omkar Music Niketan, Latest News In Divya Marathi

ओंकार संगीत निकेतनच्या सुश्राव्य मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हे व अन्य गीते ऐकताना भिंगारमधील रसिक मंत्रमुग्ध झाले. ओंकार संगीत निकेतनचा अकरावा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमेनिमित्त हा संयुक्त कार्यक्रम देशमुख सांस्कृतिक हॉल येथे नुकताच झाला. प्रमुख पाहुणे संतोष पवार यांच्या हस्ते सरस्वती पूजन, तर सुमंत गोले, डॉ. विलास देशमुख, सुनील राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पवार यांनी विद्यार्थ्यांना रियाजाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘हेरंब गिरिजा ’नय जय हे’ सामूहिक गीत व ‘परब्रह्म तुम्ही सिद्धिविनायक’ या गणाने झाली. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ या श्रद्धा देशपांडेने गायलेल्या गीताने पुन्हा एकदा आषाढी एकादशीची आठवण झाली. ‘देह देवाचे मंदिर’ या भक्तिगीताने आपला देह किती पवित्र आहे, याचे स्मरण करून दिले. विद्यार्थ्यांनी भक्तिगीते गाऊन वातावरण मंगलमय केले. ‘घन घन माला’, ‘कसली जीवाला भूल पडे’, ‘आनंद या जीवनाचा’, ‘जिथे सागरा..’, ‘रामा रघुनंदना’ या गीतांनी मैफील चांगलीच रंगली. हार्मोनियमची साथ संगीता देऊळगावकर, संकेत सुवर्णपाठकी, तबला साथ प्रसाद सुवर्णपाठकी, चाणक्य नेहूल, सुयोग उकिर्डे, आनंद कुलकर्णी, अथर्व भांबुरकर यांनी केली. पखवाज साथ आदेश मोहिते यांनी केली. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल झांबरे यांनी केले. आभार सुवर्ण बागल हिने मानले. 20 विद्यार्थ्यांच्या तबलावादनाने कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. डॉ. भावना शेळके, नंदलाल जोशी, सुहास गोले, डॉ. अरविंद शेळके, पत्रकार ज्ञानेश्वर शेलार, प्रमोद मुळे यासह संगीत रसिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी अविनाश देऊळगावकर, अनिकेत देऊळगावकर, श्रद्धा देशपांडे, अंकिता आढाव, मानसी रंगोटे, स्नेहल थोरात, जयश्री वराडे यांनी परिश्रम घेतले.

बहारदार मारवा...
ओंकार देऊळगावकर याने ‘मारवा’ राग अत्यंत प्रभावीपणे सादर केला. या शास्त्रीय गायनास प्रा. मकरंद खरवंडीकर, डॉ. धनश्री खरवंडीकर, श्याम कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, शेखर दरवडे व संगीत रसिकांनी दाद दिली.