आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारुकांड: धुळ्यातील कुख्यात मद्यतस्कर दादा वाणीला पोलिसांच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पांगरमल (ता. नगर) येथील दारुकांडप्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यात नगर पोलिसांनी धुळ्याचा कुख्यात मद्यतस्कर दादा वाणी याला ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. वाणी याने गुन्ह्याची कबुली दिली असून नगरमध्ये बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या आरोपींना अल्कोहोल पुरवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. नगरच्या गुन्ह्यात त्याला अटक करुन शनिवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाईल. 

पांगरमल (ता. नगर) येथे बनावट मद्याचे सेवन केल्यामुळे ९ नागरिकांचे बळी गेल्यानंतर बनावट दारुनिर्मितीचे रॅकेट उजेडात आले. या रॅकेटची व्याप्ती राज्यभर पसरली असल्याचे पोलिस तपासात समोर आले. या रॅकेटमध्ये धुळ्यातील एका कुख्यात मद्यतस्कर दादा वाणी याचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाणीला धुळे पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. 

बनावट मद्यनिर्मितीच्या रॅकेटमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जितू गंभीर, जाकीर शेख, हमीद शेख, मोहन दुगल, संदीप दुगल, भरत जोशी, याकूब शेख, नन्हे शेवानी आदींची नावे समोर आली आहेत. गंभीर, शेख, दुगल, जोशी हे मद्यनिर्मिती करायचे. इतर आरोपी त्यांना कच्चा माल पुरवत होते, असे तपासात निष्पन्न झाले. धुळ्याचा वाणी या रॅकेटमध्ये अल्कोहोलचा पुरवठा करत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यालाही या गुन्ह्यात नगर पोलिसांनी आरोपी केले आहे. 

बनावट मद्याच्या सेवनामुळे पांगरमल परिसरातील नऊजणांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत. नगर तालुक्यातील कौडगाव येथील दोन जणांना, पारनेर तालुक्यातील दैठणे येथील दोघांना प्राणास मुकावे लागले. बनावट दारुकांडामुळे हे बळी गेल्याच्या संशयामुळे पोलिसांनी बनावट दारुनिर्मितीचे रॅकेट उजेडात आणले. त्यातील आरोपींची साखळीही पोलिसांनी जोडली आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा दारुकांडातील आरोपींशी संपर्क पोलिसांना भोवणार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...