आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूने पाथर्डीतील युवतीचा पुण्यात मृत्यू, पदाधिकाऱ्यांची पालिका कार्यालयात पळापळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- नाथनगर भागातील प्रतीक्षा बडे या महाविद्यालयीन युवतीचा रविवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना जाग आली. बैठक घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

शहरातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून ठेकेदाराच्या हितासाठी नागरिकांच्या आरोग्याचा बळी दिला जात आहे. शहरात गेल्या पाच वर्षांत नव्हती एवढी डुकरांची संख्या वाढली आहे. गल्लीबोळातील कचरा उचलला जात नाही. क्रांती चौक, अजंठा चौक या भागात सकाळी आठपर्यंत दुर्गंधीयुक्त ओला कचरा रस्ताभर विखुरलेला असतो. गाडी येईपर्यंत डुकरांनी कचरा पांगवून चौकाचा उकिरडा केलेला असतो. नळाला पाणी आले की, रस्त्यावर पूर वाहून दलदल होते. गोड्या पाण्याचे डबके तयार होऊन डास वाढले आहेत. 

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सोमवारी तातडीची बैठक घेऊन गांभीर्याने सर्व विषयांवर चर्चा करत उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरात धुराळणीला यापूर्वीच प्रारंभ झाला असून पाणी नमुन्यांची तपासणी सुरू केली जाईल. अारोग्य विभागाला आदेश देऊन शहर स्वच्छतेला प्राधान्य देणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी सोमवारी सांगितले. 
दरम्यान, विरोधी पक्ष गटनेते आसिया चांद मन्यार प्रशासनावर टीका करत म्हणाल्या, अारोग्याच्या दृष्टीने शहरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असूनही आरोग्य विभाग तालुका प्रशासन सुस्त आहे. विशिष्ट पदाधिकाऱ्यांची पालिका कार्यालयात पळापळ सुरू आहे. कमिशन वाटून घ्या, पण गाव स्वच्छ ठेवा. स्वच्छ पाणी द्या. चिकनगुन्या, डेंग्यूचा फैलाव झाला आहे. आता तरी जागे व्हा... 
बातम्या आणखी आहेत...