आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची धडक बसून युवक जागीच ठार, घोडेगाव शिवारातील पंपासमोरील अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वेगाने जाणाऱ्या ट्रकची पाठीमागून धडक बसून एक युवक ठार, तर त्याचा मित्र जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव शिवारात पागिरे पेट्रोलपंपासमोर झाला.
विजय रंगनाथ येळवंडे (घोडेगाव, ता. नेवासे) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. विजय त्याचा मित्र अभिजित राजू बनकर हीरो होंडा स्प्लेंडरवरून (एमएच १६ एडी १३०५) नगरकडे येत होते. पाठीमागून आलेल्या ट्रकची (एमएच १६ एवाय २४२५) त्यांना जोराची धडक बसली. येळवंडे जागीच ठार झाला, तर अभिजित गंभीररित्या जखमी झाला.

याप्रकरणी विजयचा चुलतभाऊ राम काशिनाथ येळवंडे (२६, घोडेगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरून सोनई ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ट्रकचालकाने अपघात होताच वाहन तेथेच सोडून पळ काढला. या गुन्ह्याचा तपास सोनई ठाण्याचे कॉन्स्टेबल व्ही. बी. गोल्हार करत आहेत. या अपघातामुळे घोडेगाववर शोककळा पसरली होती.