आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंभळी येथे मारहाणीत एकाचा मृत्यू ; चौघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत - ग्रामपंचायतनिवडणुकीच्या वादातून तालुक्यातील कोंभळी येथे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. कोंभळी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत संजय विठ्ठल गांगर्डे (४२) याने मदत केल्याने आपले उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले, याचा राग येऊन विरोधी गटाने संजयला काठ्या, गज कुऱ्हाडीने ऑगस्टला मारहाण केली होती. यात संजय गंभीर जखमी झाला हाेता. त्याला नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा रविवारी (९ ऑगस्ट) रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुप्तता पाळली होती. या प्रकरणाची फिर्याद अतुल विष्णू गांगर्डे यांनी दिली. त्यावरून कर्जत पोलिसांनी सुधाकर शिवदास गांगर्डे, सुरेश जनाभाऊ गांगर्डे, मधुकर शिवदास गांगर्डे, रावसाहेब देविदास गांगर्डे, गणेश देविदास गांगर्डे, राहुल सुरेश गांगर्डे, दादासाहेब शिवदास गांगर्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील गणेश गांगर्डे, मधुकर गांगर्डे, राहुल गांगर्डे, रावसाहेब गांगर्डे यांना अटक केली आहे.