आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Lakh Insurance Protection To Passengers In Ahmednagar

प्रवाशांना "एएमटी' देणार एक लाखाचे विमा कवच, नगरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अनेक दिवसांपासून शहर बससेवेच्या (एएमटी) प्रतीक्षेत असलेल्या हजारो प्रवाशांना लवकरच एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल. पुढील आठवड्यापासून एएमटीच्या माध्यमातून "नगर दर्शन' उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे नगरकरांच्या मागणीनुसार शहरात लवकरच 25 पेक्षा अधिक बस सुरू करण्यात येतील, अशी माहिती ठेकेदार संस्था यशवंत आॅटोचे संचालक धनंजय गाडे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना बुधवारी दिली.
मंगळवारपासून (6 जानेवारी) एएमटी सुरू झाली. विद्यार्थी, पालक, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांसह संपूर्ण शहर उपनगरांतील नागरिकांनी या सेवेचे स्वागत केले. आनंदाची बाब म्हणजे पूर्वीच्या एएमटीपेक्षा प्रवाशांना आता अधिक चांगली सेवा देण्याचा वसा मनपा प्रशासन ठेकेदार संस्थेने घेतला आहे. येत्या तीन-चार दिवसांत एएमटीच्या सर्व प्रवाशांचा प्रत्येकी एक लाख रुपयांचा विमा उतरवण्यात येणार आहे. एएमटीचा प्रत्येक प्रवासी कसा सुरक्षित राहील, यासाठी प्राधान्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना हव्या त्या वेळेत बससेवा उपलब्ध होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना लवकरच सवलतीच्या दरात पासही मिळणार आहेत.
पर्यटनप्रेमींसाठी पुढील आठवड्यापासून नगर दर्शन उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून शहर, तसेच आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन धार्मिक स्थळांना दर रविवारी भेट देता येईल. नगरकरांनी बससेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर शहरात लवकरच 25 पेक्षा अधिक बस धावतील. नगरकरांनी यापूर्वी एएमटीला मोठा प्रतिसाद दिला, परंतु ठेकेदार संस्था प्रसन्ना पर्पलने महापालिका प्रवाशांना वेठीस धरत सहा महिन्यांपूर्वीच ही सेवा बंद केली. तेव्हापासून अनधिकृत रिक्षाचालकांनी प्रवाशांची अक्षरश: आर्थिक लूट केली. त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवाशांचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले. आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांनी एएमटीबाबत सुरूवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली. बंद झालेली ही सेवा पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी शहरातील स्थानिक अभिकर्ता संस्थेला राजी करण्यापासून, तर प्रवासी वाहतुक परवाना मिळवून देण्यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले, तब्बल सहा महिन्यांनंतर आता एएमटी सेवा पुन्हा सुरू झाली आहे.
अवैध वाहतुकीवर कंट्रोल
अनेक अडचणींना तोंड देत शहर बससेवा सुरू केली. उपप्रादेशिक परिवहन विभाग प्रवासी वाहतूक परवाना देण्यास तयार नव्हता. अखेर दंडाची रक्कम भरून परवाना मिळाला. नगरकरांसाठी एएमटी अत्यावश्यक आहे. प्रवाशांना सुरक्षित चांगली सेवा देणे, हाच एकमेव उद्देश आहे. त्यासाठी महापालिका जिल्हा प्रशासनाने शहरातील अवैध वाहतुकीवर कंन्ट्रोल ठेवला पाहीजे. नगरकरांच्या मागणीनुसार येत्या काही काळातच आणखी 15 ते 20 बस सुरू करण्यात येतील.'' धनंजयगाडे, संचालक,यशवंत ऑटो अभिकर्ता संस्था
प्रतिसाद महत्त्वाचा
बंद झालेली बससेवा आता पुन्हा सुरू झाली. आता ती पुन्हा बंद होणार नाही, यासाठी आम्ही काळजी घेणार आहोत. नागरिकांनी देखील बससेवेला जास्तीत जास्त प्रतिसाद देणे आवश्यक आहे. अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलिस प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करू, जेणेकरून नगरकरांना एएमटीमार्फत अधिक चांगली सेवा यापुढे मिळेल. संग्रामजगताप, आमदारतथा महापौर
नगर दर्शन स्तुत्य उपक्रम
नगरदर्शन हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे शहरातील पर्यटनप्रेमी, तसेच विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. या उपक्रमामार्फत शहरासह परिसरातील जास्तीत जास्त पर्यटन धार्मिक स्थळांना भेटी देणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल. महापालिका अभिकर्ता संस्थेने या उपक्रमात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.'' अशोकजोगदे, पर्यटनप्रेमी