आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर / पारनेर - महसूल खात्याच्या भरारी पथकाची नजर चुकवण्याच्या प्रयत्नात नदीपात्रात फसलेला वाळूचा ट्रॅक्टर सोडून पळ काढणार्या चालकाचा खडकावर आदळून मृत्यू झाला. रेवजी भाऊ मेंगाळ (39, रा. जांबूत ता.संगमनेर) असे मृत चालकाचे नाव आहे. दरम्यान, रेवजी यांचा खून महसूलच्या पथकानेच केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बुधवारी रात्री जांबूतमध्ये गेलेल्या संगमनेर तालुका पोलिस ठाण्याची व घारगाव पोलिस ठाण्याच्या गाड्यांच्या काचा जमावाने फोडल्या. तेथे दीडशे पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
संगमनेर - पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पारनेर तालुक्यातील देसवडे गावाच्या हद्दीत गुरुवारी (14 मार्च) मध्यरात्री ही घटना घडली. दरम्यान, हा भाग नेमका कोणत्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतो यावरून उशिरापर्यंत पोलिस अधिकार्यांत खल सुरू होता. मेंगाळ याचा मृतदेह संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. मेंगाळ मुळा नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू वाहतूक करीत असताना रात्री बाराच्या सुमारास वाळूतस्करी करणारी वाहने पकडण्यासाठी महसूलचे एक पथक मुळा नदीच्या पात्रात गेले. महसूलचे पथक आल्याची माहिती समजताच नदीपात्रातून वाळूतस्करी करणार्यांनी तेथून पळ काढला. मेंगाळ यावेळी वेगात ट्रॅक्टर नदीपात्राबाहेर काढत असताना ट्रॅक्टर फसल्याने त्याने ट्रॅक्टर सोडून पळ काढला. रात्रीच्या पळताना खडकावर पडल्याने डोक्याला मार लागून जखमी झालेया मेंगाळ यांना संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मेंगाळ यांचा मृत्यू झाला. जांबूत येथे महसूलच्या पथकानेच मेंगाळ याला मारल्याच्या आरोप झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस निरीक्षक वसंत तांबे व त्यांचे पथक जांबूतमध्ये लक्ष ठेवून होते. याप्ररकणी देसवडे येथे राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली तेथे तणावपूर्ण शांतता होती.
हद्दीचा वाद चव्हाट्यावर
घटनास्थळ हे नदीपात्रात असल्याने व ते नेमके कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे यावरून पोलिस अधिकार्यांत चर्चा सुरू होती. पारनेरचे पोलिस निरीक्षक शिवरकर व घारगावचे पोलिस निरीक्षक तांबे यांच्यापैकी एकाकडे तपास जाण्याची शक्यता आहे, तर घारगाव पोलिसांनी घटनास्थळ पारनेर हद्दीत असल्याने गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले.
पथक जिल्हाधिकारी कार्यालयाचे
जांबूत येथे गेलेले पथक संगमनेर महसूल विभागाचे नव्हते. आमच्या पथकाने ही कारवाई केली नाही. देसवडे येथील वाळूसाठय़ावर छापा टाकलेले पथक अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे असण्याची शक्यता आहे.’’ अमोल मोरे, नायब तहसीलदार, संगमनेर.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.