आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्‍णा हजारे \'लढणार\' सैनिकांसाठी; राळेगणसिद्धीत आंदोलनाची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर – निवृत्‍त सैनिकांना वन रँक वन पेन्शन मिळावे आणि नवा भूसंपादन कायदा रद्द करावा यासाठी अण्‍णा हजारे हे २ ऑक्टोबरपासून दिल्लीत बेमुदत उपोषण करणार, अण्‍णांनी आज (बुधवारी) अशी घोषणा केली.
काय आहे वन रँक वन पेन्शन
वन रँग पेंशन ही निवृत्‍त सैनिकांसाठीची योजना आहे. वेगवेगळ्या वर्षी निवृत्त झालेल्या मात्र एकाच रँकच्या सैनिकांच्या पेन्शनच्या रकमेत जास्त फरक नसावा किंबहुना ती रक्कम सारखीच असावी, अशी योजना शासनाने सुरू करावी, अशी निवृत्‍त सैनिक संघटनांची मागणी आहे. त्‍याला वन रँक वन पेन्शन पेंशन म्‍हटले आहे. सध्‍या आधी निवृत्त झालेल्या एकाच रँकच्या लष्करी अधिका-याला कमी पेन्शन आणि नंतर निवृत्त झालेल्या त्याच रँकच्या अधिका-याला जास्त पेन्शन मिळते. उदाहरणाहार्थ २००६ साली निवृत्त झालेल्या मेजर जनरलची पेन्शन ३०,३०० रुपये आहे, तर आता कुणी कर्नल निवृत्त झाल्यास त्याला ३४,००० रुपये पेन्शन मिळते. लष्करात मेजर जनरल हा कर्नल पदाच्या दोन रँक वरचा अधिकारी असतो.