आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळातून जायकवाडीला गेले एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मुळाधरणातून शुक्रवारी सायंकाळी पर्यंत १०७७ दशलक्ष घनफूट (१.०७ टीएमसी) पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले. धरणाचे दरवाजे, तसेच उजव्या डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आणखी १३९ दशलक्ष घनफूट पाणी गेल्यानंतर दरवाजातून होणारा विसर्ग आपोआप बंद होईल. त्यानंतर उर्वरित ५५४ दशलक्ष घनफूट पाणी डाव्या उजव्या कालव्यातून नदीपात्रात सोडण्यात येईल.

प्राधिकरणाच्या निर्णयानुसार महामंडळाने दिलेल्या आदेशाने नोव्हेंबरच्या रात्रीपासून मुळा धरणातून जायवाडीला पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुळाचे पाणी दोन दिवसांपूर्वीच जायकवाडीत पोहोचले. धरणाचे दरवाजे १४ हजार ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याच्या वर आहेत. साठा खालावत असल्याने पाण्याचा दाब कमी झाला असून दरवाजातून ४९७ क्युसेस वेगाने नदीपात्रात पाणी सुरू होते. उजव्या कालव्यातून २३६ डाव्या कालव्यातून १०० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या दरवाजांमधून आणखी १३९ दशलक्ष घनफूट पाणी नदीपात्रात जाणार आहे. त्यानंतर ५५९ दशलक्ष घनफूट पाणी कालव्यातून जाईल. कालव्यातून जाणारे पाणी जायकवाडीत पोहोचण्याची शक्यता कमी अाहे.