आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याच्या हमीभावासाठी जेऊर येथे रास्तारोको

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कांद्याला हमी भाव मिळावा, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने नगर - औरंगाबाद महामार्गावर जेऊर येथे शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर कांदे फेकून आपला निषेध नोंदवला. शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
उसासाठी ज्याप्रमाणे हमीभाव आहे, तसाच हमीभाव कांद्याला द्यावा, शेतकºयांना पूर्णदाबाने वीज द्यावी, लोडशेडींग रद्द करावी, खताचा काळा बाजार थांबवावा आदी प्रमुख मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजी सांगळे, शरद जाधव, गणेश तवले, अमोल दारकुंडे, विनायक वाघ, अक्षय कटारिया आदी सहभागी झाले होते.