आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याचा उच्चांक; 2651 रुपये क्विंटल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव - शेतीमालाच्या उत्पादनाचा विचार करून शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेणा-या बाजार समितीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न स्थानिक व्यापा-यांनी केला असला तरी त्यांचा विरोध झुगारून बाहेरून आलेल्या व्यापा-यांद्वारे शनिवारी कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले.

यात शेतक-यांना प्रतिक्विंटल 2651 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. स्थानिक व्यापा-यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे लिलाव ठप्प होऊन कांद्याचे भाव गडगडतील, अशी भीती शेतक-यांना वाटत होती. यापूर्वी कांद्याला 1500 ते 1600 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला होता.