आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Onion Producer Farmers Starts Agitation In Rahuri

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - कांद्याचे भाव कमी केल्याच्या संशयावरून शेतकर्‍यांनी रविवारी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नगर-मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.


दुपारपर्यंत लिलाव सुरळीत सुरू होते. अखेरच्या टप्प्यात भाव कमी निघाल्याचा शेतकर्‍यांना संशय आला. एका व्यापार्‍याने 10 गोण्यांचा भाव 7 हजार रुपये क्विंटल काढला. हे समजताच शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली. अखेर त्या व्यापार्‍याचा स्वत:चा कांदा असल्याचे निष्पन्न झाल्याने शेतकरी लिलावास तयार झाले. दहा-पंधरा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्ग रोखला. इतर ठिकाणच्या भावाची चौकशी केल्यानंतर लिलाव पूर्ववत सुरू झाले. बाजार समितीचे संचालक ताराचंद तनपुरे, सुरेश बाफना, प्रभाकर पानसंबळ यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली. रविवारी सुमारे 23 हजार 34 कांदा गोण्यांची आवक झाली. बाजारभाव प्रतवारीनुसार याप्रमाणे - क्रमांक एक 4505 ते 5600 रुपये, दोन 3505 ते 4500, तीन 2500 ते 3500, गोल्टी कांदा 4000 ते 5000, जोडकांदा 2400 ते 3000 रुपये. दर आणखी वाढण्याची शक्यताआहे.


शेतकर्‍यांनी सत्यता पडताळून पाहावी
ज्या शेतकर्‍यांना कमी भाव निघाला असे वाटते, त्यांनी कांदा विक्री करू नये. शेतकर्‍यांनी सत्यता पडताळून पाहावी, नंतर निर्णय घ्यावा, असे आवाहन सभापती अरुण तनपुरे यांनी केले.