आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याचा उच्चांक; 2651 रुपये क्विंटल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव - शेतमालाच्या उत्पादनाचा विचार करून कायम शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणार्‍या बाजार समितीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न स्थानिक व्यापार्‍यांनी केला असला तरी त्यांचा विरोध झुगारून बाहेरून आलेल्या व्यापार्‍यांद्वारे शनिवारी कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले. या लिलावात कांद्यासाठी शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 2651 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.

स्थानिक व्यापार्‍यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे हे नियोजित लिलाव ठप्प होऊन कांद्याचे भाव गडगडतील, अशी भीती शेतकर्‍यांना वाटत होती. मात्र, लिलावात कांदा उत्पादकांचा चांगलाच फायदा झाला आहे. यापूर्वी कांद्याला 1500 ते 1600 रुपये क्विंटल असा भाव होता. दरम्यान, नाशिकमध्ये शनिवारी कांद्याला प्रतिक्विंटल 2100 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.