आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाईन गॅस बुकिंगसाठी ग्राहकांची अडवणूक नको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सिलिंडरचे ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी गॅस एजन्सींनी ग्राहकांची अडवणूक न करता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी शुक्रवारी केली.

जिल्ह्यातील गॅस वितरकांच्या कार्यशाळेत कासार बोलत होते. नगर, नेवासे, जामखेड, शिर्डी, कोपरगाव, अकोले, कर्जत, राहुरी, पारनेर व पाथर्डी या तालुक्यांमधील गॅसवितरक यावेळी उपस्थित होते. वितरकांनी ऑनलाईन बुकिंगबाबत प्रचार करून जनजागृती करावी. ज्या ग्राहकांकडे मोबाइल अथवा दूरध्वनी नाही त्यांना एजन्सींमध्ये दूरध्वनी सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना कासार यांनी केली.

हिंदुस्थान पेट्रोलियमचे अधिकारी राजनारायण वैद्य, अन्नधान्य पुरवठा अधिकारी भारती सागरे, मनसेचे पदाधिकारी संजय झिंजे व काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख आदी यावेळी उपस्थित होते.