आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन प्रक्रियेमुळे वाळू लिलावावर पाणी, ठेकेदारांकून प्रतिसाद मिळत नसल्याने अडचणी वाढल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ऑनलाइन लिलावाच्या त्रासदायक प्रक्रियेने वाळू लिलावांवर पाणी फिरवले असून, वर्षभरात पाच वेळा वाळू लिलाव ऑनलाइन झाले. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. आता सहाव्यांदा प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील तब्बल १६० वाळूसाठ्यांचे लिलाव झाल्याने अवैध वाळूउपसा सुरूच आहे.
जिल्ह्यातील मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे आहेत. नगर, नेवासे, पारनेर, श्रीगोंदे, संगमनेर, अकोले, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी, पाथर्डी शेवगाव या तालुक्यांमधील नदीपात्रांमध्ये एकूण १७९ वाळूसाठे आहेत. वाळूसाठ्यांच्या लिलावातून प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळतो. या वाळूसाठ्यांची लिलाव प्रक्रिया गेल्या महिन्यापासून सुरू आहे. पूर्वी वाळूचे लिलाव बोली पध्दतीने होत. मात्र, त्यात पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने हे लिलाव ऑनलाइन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाळूसाठ्यांसाठी ऑनलाइन निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र, ही ऑनलाइन प्रक्रिया किचकट असल्यामुळे केवळ १९ वाळूसाठ्यांचा लिलाव होऊ शकला. १६० वाळूसाठ्यांचा लिलाव होणे अद्याप बाकी आहे.

लिलाव झाल्याने चोरट्या मार्गाने वाळूउपसा सुरू आहे. महसूल पोलिस प्रशासनाने या अवैध वाळूउपसा करणाऱ्यांविरुध्द मोहीम उघडली असली, तरी रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळू उपसा केला जातो. रात्री वाळूचा उपसा करून ती एका ठिकाणी साचवण्यात येते. त्यानंतर तिची वाहतूक विक्री केली जाते. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या काळात गौण खनिज विभागाने अवैध वाळूउपसा करणाऱ्या ४८५ जणांवर दंडात्मक कारवाई करून ७० कोटी ९८ लाख ६०६ रुपयांचा दंड ठोठावला. तथापि, वाळूचोरीला आळा बसलेला नाही.

असे झाले चार महिन्यांत पाचवेळा वाळूचे लिलाव

जानेवारीपासूनऑनलाइन लिलावास सुरुवात झाली. जानेवारीत दहा साठ्यांचे लिलाव झाले. त्यातून कोटी ५८ लाख महसूल मिळाला. २१ फेब्रुवारीला साठ्यांचा लिलाव झाला. त्यातून कोटी ९० लाख २० हजारांचा महसूल मिळाला. मार्चला एका साठ्याचा लिलाव झाला. त्यातून २५ लाख ४६ हजार मिळाले.१६ मार्चला एकही निविदा आली नाही. २७ मार्चला चार साठ्यांचे लिलाव झाले.यात कोटी ८८ लाखांचा महसूल मिळाला.

११ कोटींचा महसूल

गेल्याचार महिन्यांत पाचवेळा झालेल्या ऑनलाइन वाळू लिलावातून ६६ हजार ६०१ ब्रास वाळूचा लिलाव झाला. त्यातून प्रशासनाला ११ कोटी ६२ लाख ५२ हजार २०९ रुपयांचा महसूल मिळाला आहे. जानेवारी महिन्यात पहिला लिलाव झाला होता. यात कोटी ५८ लाख मिळाले.

२३ ला पुन्हा ऑनलाइन वाळूचे होणार लिलाव

^ऑनलाइन पध्दतीने वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, केवळ १९ वाळूसाठ्यांचा लिलाव झाला आहे. अजून १६० वाळूसाठ्यांचे लिलाव होणे बाकी आहे. लिलावांना प्रतिसाद मिळावा, यासाठी निविदेचे दर २५ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. निविदा भरण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या दिवशी ऑनलाइन पध्दतीने वाळूचे लिलाव होणार आहे. '' संजय बामणे, गौण खनिज अधिकारी, नगर.