आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बँकेसाठी अवघे ३७ टक्के मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाउसाहेब फ‍िरोदिया शाळेत शहर बँक न‍िवडणुकीच्या मतदानासाठी झालेली गर्दी. - Divya Marathi
भाउसाहेब फ‍िरोदिया शाळेत शहर बँक न‍िवडणुकीच्या मतदानासाठी झालेली गर्दी.
नगर - शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी रविवारी अवघे ३६.६९ टक्के मतदान झाले. मंगळवारी (२८ जुलै) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहर बँकेसाठी सत्ताधारी प्रा. मुकुंद घैसास, सुभाष गुंदेचा यांच्या नेतृत्वाखालील आधुनिक पॅनेल बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. मोहन कामथ यांच्या नेतृत्वाखालील अंकुश पॅनेलमध्ये लढत झाली. यात दोन अपक्षांनीही प्रचार दोन्ही पॅनेलवर टीकास्त्र सोडून रंगत आणली.
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, आनंद विद्यालय पुणे अशा तीन केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील दोन्ही केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दोन्ही पॅनेलचे प्रमुख उमेदवारांकडून मतदान केंद्राच्या बाहेरच मतदारांचे हात जोडून स्वागत करण्यात येत होते. २२ हजार २२० पैकी हजार १५३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. फिराेदिया हायस्कूल केंद्रावर हजार ६५१, आनंद विद्यालय केंद्रावर हजार ४३१ पुणे केंद्रावर ७१ मतदारांनी मतदान केले. प्रचारादरम्यान आधुनिक पॅनेल अंकुश पॅनेलकडून परस्परांवर आरोप-प्रत्याराेप झाले. नव्या कायद्यानुसार संचालकांची संख्या १५ पर्यंत कमी झाल्याने आधुनिक कडून काहींची उमेदवारी कापण्यात आली. त्यांना सोबत घेत अंकुशकडून वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात अाला.
न‍िकालाची उत्सुकता
मतदानासाठीसभासदांनी न‍िरुत्साह दाखवल्याने अत्यल्प मतदान झाले. त्यामुळे न‍िकालाबाबतची उत्सुकता वाढली आहे. सध्या बँकेवर प्रा. मुकुंद घैसास यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची सत्ता आहे. सात वर्षांनंतर झालेल्या न‍िवडणुकीतून सत्ता परिवर्तन होते की, सत्ता राखण्यात प्रा. घैसास यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.