आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Leader Radhakrishna Vikhe Patil Statement About State Government

राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा : विखे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- अमरावतीत शेतक-यांने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे राज्य सरकारच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी केली. नैसर्गिक व सरकारी धोरणाच्या दुहेरी दुष्काळात शेतकरी होरपळून निघत आहे, असे टीका त्यांनी केली.
विखे म्हणाले, सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी साडेचार हजार रुपये मदत जाहीर केली होती. दोन महिने उलटत आले तरी शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही. गेल्या वर्षी खरेदी केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ७ लाख क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. मात्र, या वर्षी खरेदी केंद्रच सुरू न झाल्याने अवघ्या ५० हजार क्विंटलची खरेदी झाली. परिणामी उर्वरित शेतमालाच्या विक्रीत शेतकऱ्यांची लूटमार झाली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सरकारला सहआरोपी करण्याची मागणी केली होती. अमरावती जिल्ह्यातील थिलोरी येथील गजानन देवराव खंडाळे या तरुण शेतकऱ्याने बुधवारी सरकारविरोधात चिठ्ठी लिहित जीवनयात्रा संपवली. आता या चिठ्ठीच्या आधारे युती सरकारविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.'