आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - देश सक्षम करायचा असेल तर आधी अपंगांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. देशाच्या विकासाचे स्वप्न पाहणा-या तरुणाईने दुर्दम्य आशावाद जोपासावा, असा सूर जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सामाजिक कार्यकर्त्या नसीमा हुरजूक व प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी नेवासा तालुक्यातील सोनई येथे आळवला.
निमित्त होते यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्याचे.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विज्ञान क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. माशेलकर यांना, अपंगांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल हुरजूक यांना व कला क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल गुलजार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी गुलजार म्हणाले, मी पूर्वी गॅरेजमध्ये कामाला होतो. तेथे वस्तूंना एकत्र जोडायचे काम करायचो. आताही तेच करतो, फरक एवढाच की आता लोकांच्या वेदना सांधायचे काम करतो. त्यामुळे जेवढे चित्रपट बनवले त्यातून सामाजिक संदेश देण्याचाच प्रयत्न केला.
‘देवडी’चे अर्पण : गुलजार यांच्या अंबरिष मिश्र अनुवादित ‘देवडी’ या मराठी कथासंग्रहाचे प्रकाशन नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरात झाले. त्यानंतर गुलजार यांनी हे पुस्तक पैस खांबाला अर्पण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.