आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणी परिषदेचा देशातील पहिला जैविक खत निर्मिती प्रकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भिंगारमध्ये गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून जैविक खत निर्मितीचा घनकचरा प्रकल्प छावणी परिषदेने (कॅन्टाेन्मेंट बोर्ड) सुरू केला आहे. असा प्रकल्प सुरू करणारी अहमदनगर छावणी परिषद ही देशातील ६२ छावणी परिषदांपैकी पहिली ठरली आहे. दरेवाडी येथे असलेल्या या टन क्षमतेच्या प्रकल्पातून खत निर्मिती होऊन त्या खताची ठेकेदारामार्फत विक्री करण्यात येते.
भिंगार परिसरात गोळा होणाऱ्या दररोजच्या कचऱ्यातून ओला सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते. वर्गीकरण केलेल्या कचऱ्यामध्ये निम्म्याच्यावर माती, रेती, विटांचे तुकडे, खडी आणि प्लास्टिकचा कचरा असतो. रोज निघणाऱ्या कचऱ्यापैकी निम्म्या कचऱ्याची विल्हेवाट जैविक खत निर्मितीच्या माध्यमातून करण्याचे उद्दिष्ट छावणी परिषदेने ठेवले आहे. दरेवाडी शिवारात उभारलेला हा प्रकल्प टन क्षमतेचा अाहे. यांत्रिक पद्धतीने कचरा कुजवून कंपोस्ट पद्धतीने खतनिर्मिती केली जाते. या खताची ठेकेदारामार्फत विक्री होते.

चार महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला. तो कशा पद्धतीने चालतो आणि त्यातून ओल्या कचऱ्याची खरोखरच विल्हेवाट लावली जाते का, याची खातरजमा झाल्यानंतर तो नियमित सुरू करण्यात आला. या प्रकल्पाशेजारीच आणखी १० टन क्षमतेचा खत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडे पाठवला आहे, असे छावणी परिषदेेचे मुख्य कार्यकारी अिधकारी विनित लोटे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

दरेवाडी येथे ब्रिटिशकाळापासून कचरा टाकण्यात येतो. या परिसरातील खड्डे बुजल्याने तेथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची दुर्गंधी येत असल्याची परिसरातील रहिवाशांची तक्रार होती. छावणी परिषदेने तेथे खत प्रकल्प उभारल्याने कचऱ्याची विल्हेवाट लागत आहे. या खत प्रकल्पावर भिंगारमध्ये स्वच्छतेकडे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, कनिष्ठ स्वच्छता निरीक्षक गणेश भाेर यांचे लक्ष असते.

देशातील एकमेव जैविक खत प्रकल्प भिंगारकरांसाठी येथे सुरू झाला असताना दुसरीकडे नगर महापािलकेचा बुरूडगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होताच त्यावर वर्षभरात ६६ लाखांची उधळपट्टी करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...