आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट्रेट काढताना सिद्ध करावे लागते स्वत:ला - चित्रकार प्रमोद कांबळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पोट्रेट काढताना चित्रकाराला स्वत:ला सिद्ध करावे लागते. ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ अशी स्थिती असल्याने त्याला आपले सगळे कसब पणाला लावावे लागते. दुर्दैवाने पोट्रेट काढण्याच्या कलेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. अशा वेळी या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम पोट्रेट चित्रकार निर्माण होऊ शकतील, असा विश्वास प्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी शनिवारी व्यक्त केला.

शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन कलाजगतच्या वतीने टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीचित्रण (पोट्रेट) स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी कांबळे बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी विविध कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. रविवारी (११ सप्टेंबर) व्यावसायिक चित्रकार या उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्यात सुहास बहुळकर यांच्यासह नामवंतांचा समावेश असेल.

उदघाटन प्रसंगी बोलताना फाउंडेशनचे संचालक नरेंद्र फिरोदिया यांनी या स्पर्धेची व्याप्ती पुढील काळात आणखी वाढवली जाईल, असे सांगून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्विततेसाठी प्रमोद कांबळे, शुभंकर कांबळे त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत.

मान्यवर झाले मॉडेल
पोट्रेट काढण्यासाठी मॉडेल म्हणून अनेक नामवंत उपस्थित होते. त्यात सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरूजी, चित्रकार श्रीधर अंभोरे, वसंत विटणकर, अनिल डेंगळे, राजेंद्र वहाडणे, ल. धों. खराडे, हेमंत दंडवते, लेखक विलास गिते, डॉ. अरूण मांडे, आर्किटेक्ट मनोज जाधव, ग्रँडमास्टर शार्दुल गागरे आदी अनेकांचा समावेश होता.
बातम्या आणखी आहेत...