आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सिटोसिन वापरामुळे हाडे ठिसूळ!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - म्हशी पान्हवण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिटोसिनची चोरट्या मार्गाने विक्री व सर्रास वापर होत आहे. अन्न व औषध प्रशासनही अवैध वापर व विक्री करणा-यांच्या मागावर असल्याचे सांगते. मात्र, कारवाई होत नाही. जिल्ह्याचा विस्तार मोठा असल्याने तेही हतबल झाले आहेत. शेजारील आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश राज्यातून येणाºया ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या बाटल्या थेट जनावरांच्या गोठ्यापर्यंत पोहोच केल्या जात आहेत. जनावरांचे दूध काढण्यासाठी ऑक्सिटोसिन हार्मोनचा सर्रास वापर होत असल्याचे आढळले आहे. नैसर्गिकरित्या सस्तन प्राण्यांमध्ये मिळणारे हे हार्मोन कृत्रिमरित्या बनवले जात आहेत. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम जनावरांबरोबरच वयात येणाºया मुली, महिलांसाठीदेखील धोकादायक आहे. त्यामुळे म्हशीचे दूध घेताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.
गोठेवाल्यांची चुप्पी
शहर व परिसरातील केडगाव, चास, अकोळनेर, सारोळा कासार, मेहकरी, देऊळगाव, शेंडी, नारायणडोह, उक्कडगाव, पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उजैनी, आगडगाव, नेप्ती, जेऊर या भागात खासगी गोठेवाल्यांची दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. ऑक्सिटोसिनच्या वापराबाबत गोठेवाल्यांनी जणू काही माहिती नसल्याचीच भूमिका घेतली आणि आम्ही ते वापरत नसल्याचे सांगितले. हाडांचे आजार व मुली वेळेच्या आधीच वयात येण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे, हेही एक कारण आहे. ऑक्सिटोसिनचा वापर हा मर्यादित असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मानवी शरीरावर परिणाम
ऑक्सिटोसिन वापरास केंद्र सरकारने बंदी घातली असली तरी चोरट्या मार्गाने येणाºया या ऑक्सिटोसिनच्या चुकीच्या वापरामुळे जनावरांवर व त्याचबरोबर मानवी शरीरावरही त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग याबाबत कोणतीही माहिती घेत नाही, हे विशेष. तज्ज्ञांच्या दिलेल्या अहवालानुसार राज्यातील 65 टक्के दूध भेसळयुक्त आहे. ही भेसळ म्हणजे
त्यात ऑक्सिटोसिनचे प्रमाणही गृहित धरले आहे. भेसळ रोखण्यासाठी पशुपालकांनीच काळजी घेणे आवश्यक असल्याचेही
तज्ज्ञ सांगतात.
दूध लवकर पण वाढत मात्र नाही
पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या मते, ऑक्सिटोसिनमुळे गाय अथवा म्हशीला जास्त दूध येत नाही. फक्त दूध येण्याची गती वाढते, पण यामुळे जनावरांचे आरोग्य नष्ट होते आणि तीन वर्षांत दुभती जनावरे दूध देणे बंद करतात. त्यानंतर त्याची रवानगी थेट कत्तलखान्यात होते. त्यामुळे कत्तलखान्यांचा धंदा तेजीतआहे.
ऑक्सिटोसिनचे धोके
गाई व प्रामुख्याने म्हशीला दिल्या जाणाºया ऑक्सिटोसिनची मात्रा दुधात आणि मांसात येते. असे दूध पिण्यात आल्यास मुलांमध्ये ऐकू येण्याची क्षमता आणि नजर कमजोर होते. थकवा लवकर येतो आणि उत्साह नसतो. गर्भवती महिलांना प्रसूतीनंतर रक्तस्राव जास्त प्रमाणात होतो.
दूध येण्यासाठी उत्प्रेरक
हे एक हार्मोन आहे, जे मेंदूत असलेल्या पिट्युटरी ग्रंथीमध्ये बनते आणि साठवले जाते. मुख्यत्वे गर्भपिशवीचे तोंड उघडण्यासाठी या हार्मोनची मदत होते आणि दूध येण्यासाठी हे उत्पे्ररकाचे काम करते. 1953 पासून हे हार्मोन कृत्रिम रूपाने बनविणे सुरू झाले आहे. काही दूधवाले जास्त दुधाच्या हव्यासाने दिवसातून दोनदा ऑक्सिटोसिनचा डोस देतात.
ऑक्सिटोसिनवर बंदी
दूध काढण्यासाठी ऑक्सिटोसिनच्या वापरावर बंदीच आहे. कोणतेही मेडिसीन प्रमाणापेक्षा घातकच आहे. दुभत्या जनावरांना गरज असेल तरच डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिसीन दिले जाऊ शकते. बंदी असलेल्या औषधावर कारवाई करण्याचा अधिकार अन्न औषध प्रशासनाचा आहे. फक्त जनावराचे अंग बाहेर आले तरच ऑक्सिटोसिनचा वापर करतात. जनावरांना पान्हवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे शतावरी, सफेद मुसळी चांगले आहे. मात्र, त्यांचेही विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने म्हणजे म्हशींच्या आचळांना चांगला मसाज करणे व दूध देण्यासाठी गोठ्यात चांगले वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.’’
डॉ. एस. के. तुंभारे, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद.
गुन्हे दाखल करणार
मागील आठवड्यात शहरातील काही गोठ्यांवर दूध काढल्या काढल्या नमुने घेतले आहेत. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचा अहवाल जर ऑक्सिटोसिन आले तर निश्चितच गुन्हे दाखल करू. ऑक्सिटोसिन वापरले म्हणून श्रीरामपूर येथे एकावर कारवाई केली आहे. नाशिकमधून चोरटी ऑक्सिटोसिनची विक्री जिल्ह्यात होत आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. ऑक्सिटोसिनचा वापर जनावरे पान्हवण्यासाठी करणे योग्य नाही. आर. थेटे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.