आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचपुतेंच्या भाजप प्रवेशाविरुद्ध महायुतीचे पदाधिकारी एकवटले; गांधी समर्थकांचा विरोध कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन नगर तालुक्यातील शिवसेना-भाजप महायुतीच्या पदाधिकार्‍यांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. नगर तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन निष्ठावंतांना डावलल्यास नगर व श्रीगोंदे मतदारसंघात विकास आघाडी स्थापन करण्याचा इशारा दिला आहे. पाचपुतेंना पक्षात प्रवेश दिल्यास आम्हीही विरोध करु, असे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुवेंद्र गांधी यांनी स्पष्ट केले.

नगर तालुक्यातील महायुतीच्या वतीने बाजार समितीच्या कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. भाजपचे तालुकाध्यक्ष शरद दळवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश कार्ले, रिपाइं गटाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे आदी यावेळी उपस्थति होते. राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याची जाणीव झाल्यानेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील नेते मंडळींची शिवसेना-भाजपमध्ये येण्यासाठी रांग लागली आहे. सन १९९९ मध्ये विधानसभा नविडणुकीत ऐनवेळी बाहेरील व्यक्तींना उमेदवारी दिली गेली. या आयाराम-गयाराममुळे युतीची सत्ता गेली. त्यामुळे आता शिवसेना-भाजप-रिपाइं गटातील निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी महायुतीत येणार्‍या नेत्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी या पदाधिकार्‍यांनी केली.

आघाडीच्या नेत्यांनी आतापर्यंत श्रीगोंदे मतदारसंघातील गावांवर अन्याय केला आहे. या मतदारसंघात उमेदवारी देताना खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व महायुतीच्या नेत्यांना विश्वासात घ्यावे; अन्यथा विधानसभा नविडणुकीत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा इशारा या पदाधिकार्‍यांनी दिला. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुवेंद्र गांधी, हरिभाऊ कर्डिले, सोपान कुलांगे, दत्ता सप्रे, बाळासाहेब मेटे, बाळासाहेब बिबे, रमेश पिंपळे, दिलीप भालसिंग आदी यावेळी उपस्थति होते.
पाचपुतेंचा इतिहास सर्वांना माहिती
श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची उमेदवारी बबनराव पाचपुते यांना दिल्यास आम्ही विरोध करु. जे सहा-सहा वेळा पक्ष बदलतात, त्यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला पाचपुते नको आहेत. पक्षाने पाचपुतेंना उमेदवारी दिली, तर त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही. निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली पाहिजे. पाचपुतेंना उमेदवारी दिल्यास त्यांच्यावर शाई फेकू.''
सुवेंद्र गांधी, जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा