आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pachpute Nagwade Group In Nagwade Sugar Factory Elections

उमेदवारीत नागवडेंनी "फिरवली भाकरी', नागवडे कारखान्यात पाचपुते नागवडे गटातच लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - नागवडे साखर कारखाना निवडणुकीत उमेदवार देताना सत्तारूढ शिवाजीराव नागवडे गटाने अनेक विद्यमान संचालकांना उमेदवारी नाकारून सत्तेची भाकरी फिरवली. निवडणुकीसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते नागवडे गटातच सरळ लढत होणार असल्याचे शनिवारी अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले.
सत्ताधारी नागवडे गटाने उमेदवारी देताना कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांना वगळण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. विद्यमान संचालकांपैकी अनेकांना घरी बसवले. त्यामध्ये माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इथापे, विलासराव वाबळे, अॅड. बाळासाहेब काकडे, तुळशीराम रायकर, संपत नितनवरे, जाईबाई काळाणे, जिजाराम खामकर, रंगनाथ कुताळ यांचा समावेश आहे. ज्यांना उमेदवारीत पुन्हा संधी मिळाली त्यात नागवडेंसह त्यांचे पुत्र राजेंद्र, मावळते उपाध्यक्ष केशव मगर, सुभाष शिंदे, श्रीनिवास घाडगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, राजकुमार पाटील यांचा समावेश आहे. धनसिंग भोयटेंच्या जागी त्यांचे पुतणे योगेश, तर अशोक रोडेंच्या जागी त्यांच्या पत्नी अंजली यांना संधी दिली.

पाचपुते गटाच्या उमेदवारीमध्ये पाचपुतेंसह बाबासाहेब भोस, भगवानराव पाचपुते, आबा कोल्हटकर या संचालकांना संधी मिळाली. लक्ष्मण नलगे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या भावजयीला स्थान मिळाले. नंदा कुरूमकर यांनी अर्जच भरला नाही. पाचपुते गटाच्या वतीने माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे अरुण हिरडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तीन अपक्ष रिंगणात आहेत.

दोन्ही पॅनेलची गटनिहाय यादी :
श्रीगोंदे गट - सुभाषशिंदे, विजय कापसे, शिवाजी जगताप (नागवडे गट). बाबासाहेब भोस, संतोष खेतमाळीस, प्रकाश उंडे (पाचपुते गट), काष्टी-अरुणपाचपुते, योगेश भोयटे, शिवाजीराव नागवडे (नागवडे गट). बबनराव पाचपुते, भगवानराव पाचपुते, ज्ञानदेव कोल्हटकर (पाचपुते गट). कोळगाव-श्रीनिवासघाडगे, सोपान खोमणे , बापू कदम (नागवडे गट). बबन गदादे, रमेश खोमणे, संजय नलगे (पाचपुते गट). बेलवंडी-विलासकाकडे, अण्णासाहेब शेलार (नागवडे गट). बाळासाहेब थोरात, त्रिंबक मुठाळ (पाचपुते गट). टाकळीकडेवळीत-अॅड. सुनीलभोस, राजकुमार पाटील (नागवडे गट). सतीश नवले, नानासाहेब झिटे (पाचपुते गट). लिंपणगाव-विश्वनाथगिरमकर, केशव मगर (नागवडे गट). रामदास गिरमकर, जिजाबा रोडे (पाचपुते गट). सेवासंस्था-राजेंद्रनागवडे (नागवडे गट), भगवानराव पाचपुते (पाचपुते गट). अनुसूचितजाती- सुनीलमाने (नागवडे गट), कैलास माने (पाचपुते गट). महिलाप्रतिनिधी- अंजलीरोडे, सुरेखा लकडे (नागवडे गट). मंगल नलगे मुक्ताबाई मगर (पाचपुते गट). इतरमागास गट - बंडूरायकर (नागवडे गट), एकनाथ बोरुडे (पाचपुते गट). भटक्याजातीगट - युवराजचितळकर (नागवडे गट), भाऊसाहेब कोळपे (पाचपुते गट).