आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे भरूनही महापालिका पाडेना धोकादायक इमारत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बागडपट्टी येथील रहिवासी बलबीरसिंग यांनी धोकादायक इमारत पाडण्यासाठी मनपाकडे ऑक्टोबर २०१४ मध्ये पैसे भरले. पाठपुरावा करूनही मनपा इमारत पाडण्यास तयार नाही. त्यामुळे सिंग हवालदिल झाले आहेत. एकीकडे मनपा धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावत आहे, तर दुसरीकडे या इमारती पाडून घेण्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

शहरात दीडशेपेक्षा अधिक धोकादायक इमारती आहेत, परंतु मनपाकडे केवळ ४९ इमारतींचीच नोंद आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा दरवर्षी धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावते. नोटिसांचा आधार घेत बागडपट्टी येथील सिंग यांनी मनपाकडे ऑक्टोबर २०१४ मध्ये इमारत पाडण्यासाठी ५,९५० रुपये शुल्क भरले, परंतु त्यांची इमारत पाडण्यासाठी मनपाने अद्याप कार्यवाही केेलेली नाही. इमारत पाडण्यासाठी सिंग यांनी सर्वप्रथम जून २०१२ मध्ये अर्ज दिला होता. इमारत जीर्ण झाली असून पावसामुळे ती कधीही पडू शकते, असे सिंग यांनी अर्जात स्पष्ट केले आहे. शहर अभियंता नंदकुमार मगर यांनी जानेवारी २०१५ मध्ये सिंग यांच्या अर्जाची दखल घेतली.
इमारत पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी लागणारा खर्च संबंधित इतारत मालकाकडून वसूल करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते, परंतु पोलिस बंदोबस्त मिळाल्याने मनपाने इमारत पाडण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सिंग हवालदिल झाले आहेत. इमारतीमध्ये चार भाडेकरू आहेत, त्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.
पाठपुरावा करूनही कार्यवाही नाही
- मनपाकडे इमारत पाडून घेण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने इमारत अजूनही उभी आहे. पावसामुळे ही इमारत कधीही पडू शकते. त्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपाने ही इमारत तातडीने पाडून घेण्यासाठी कार्यवाही करावी.''
बलबीर सिंग, अर्जदार
बातम्या आणखी आहेत...