आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेच्या दोन्ही गटांचे पॅनल निश्चित, आज होणार चिन्हांचे वाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची खेळी फिसकटल्यानंतर आता १५ संचालक निवडण्यासाठी मे रोजी मतदान होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे बाळासाहेब थोरात यांचे गट या निवडणुकीत आमने-सामने आहेत. दोन्ही गटांचे पॅनल निश्चित झाले असून सोमवारी (२७ एप्रिल) चिन्हांचे वाटप होणार आहे.
अर्ज माघारीच्या शेवटच्या मुदतीपर्यंत विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातील १४ पैकी जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १५ जागांसाठी मे रोजी मतदान होणार आहे. या १५ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. सोसायटी मतदारसंघाच्या जागांवरील लढतीत १७ उमेदवार मैदानात आहेत.
श्रीगोंदे येथील तिहेरी लढत वगळता उर्वरित अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासे, जामखेड, कर्जत, कोपरगाव या तालुक्यात एकास-एक लढत आहे. शेतीपूरक संस्था बिगरशेती संस्था, तसेच अनुसूचित जाती जमाती या तीन मतदारसंघांतील तीन जागांसाठीही एकास-एक लढत होणार आहे. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी पाच महिला रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय भटक्या जमाती विमुक्त जाती किंवा विशेष मागास प्रवर्ग या दोन मतदारसंघातील दोन जागांसाठी तिहेरी लढत रंगणार अाहे.

विखे थोरात गटांचे पॅनल निश्चित झाले असून सोमवारी चिन्ह मागताना पॅनलसाठी एकाच चिन्हाची मागणी करण्यात येणार आहे. थोरात गटातून यशवंतराव गडाख, मधुकर पिचड, बाजीराव खेमनर स्वत: थोरात यांच्याकडील हक्काच्या एकगठ्ठा मतदारांवर निवडणुकीची रणनीती आखण्यात येत आहे. विखे गटाकडूनही भाजपची साथ मिळवून त्यांना शह देण्याचे आडाखे बांधण्यात येत आहेत. मात्र, भाजपची भूमिका अजूनही संदिग्धच अाहे. पॅनलमध्ये नसणाऱ्या चार उमेदवारांना मात्र स्वतंत्र चिन्ह घेऊन लढावे लागणार आहे.

अकोल्यात लक्षवेधी लढत
अकोले तालुका सोसायटी मतदार संघातून विद्यमान संचालक सीताराम गायकर आणि अमृतसागर तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी धुमाळ यांच्यात लढत आहे. अनुसूचित जाती जमाती शेती-बिगरशेती मतदार संघातून आमदार वैभव पिचड आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्यात लढत आहे. या दोन्ही लढती लक्षवेधी ठरतील. सोसायटी मतदारसंघात अकोले तालुक्यात ८५ ठरावाचे मतदार आहेत, तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून जिल्हा बँकेतील सर्व मतदार मतदान करतील. गायकर हे यापूर्वी सलग तीन वेळा संचालक राहिले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजी धुमाळ हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सध्या ते भाजपमध्ये आहेत.

विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भांगरे यांनी कंबर कसली असून पिचड यांनीही त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मतदारांच्या मोजक्या संख्येतून घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे. या लढतीकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बिनविरोधमुळे राष्ट्रवादी खुश

जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा सहकारी मतदारसंघात तालुक्यातून विद्यमान उपाध्यक्ष अॅड. उदय शेळके यांची बिनविरोध निवड झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तालुका सेवा संस्था मतदारसंघात विद्यमान उपाध्यक्ष अॅड. शेळके यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांच्या रामशेठ एरंडे यांची उमेदवारी निश्चित होती, परंतु एरंडे यांच्या अर्जावर शेळके यांनी आक्षेप घेतल्याने हा अर्ज बाद झाला. मारुती रेपाळे यांनीही माघार घेतल्याने शेळके बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याबरोबरच सबाजी गायकवाड, प्रियंका शिंदे हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.