आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत महासंघाचे आज अधिवेशन, रविवारी समारोपास मंत्री शिंदे उपस्थित राहणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्य अधिवेशनाला शनिवारी (२५ एप्रिल) स्वस्तिक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सुरुवात होत आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी अधिवेशनाचा समारोप होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष लांडे यांनी दिली.

महासंघाचे हे दहावे राज्य अधिवेशन आहे. शनिवारी दुपारी वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. दीड वाजता तीन हजार कर्मचाऱ्यांची रॅली शहरातून काढण्यात येणार आहे. दुपारी वाजता जाहीर सभा होईल. सायंकाळी वाजता विविध राजकीय संघटनात्मक विषयांवर प्रतिनिधींची चर्चा होणार असून विविध ठराव मंजूर होतील.

रविवारी मंत्री मुंडे-पालवे, शिंदे, जि. प. अध्यक्ष मंजूषा गंुड, आमदार संग्राम जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, महासंघाचे अध्यक्ष डॉ. तानाजी ठोंबरे, सचिव नामदेव चव्हाण यांच्या उपस्थितीत समारोप होईल.

जि. प. प्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी लागू करावी, आकृतिबंध बिगरआकृतिबंध असा भेदभाव करता सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे अशा विविध मागण्यांवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...