नगर- नाशिक येथून जात वैधता प्रमाणपत्र मिळाले असूनही काही गुंडांनी उमेदवार माया जगताप यांना धमक्या दिल्या. जातीवाचक व मानहानी होईल असे वर्तन केले. याप्रकरणी पंधरा जणांवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य संजय जगताप यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
जगताप यांचे पती संजय जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे की, माया जगताप ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मधून निवडणूक लढवत आहेत. जात वैधता प्रमाणपत्रासाठी आम्ही नाशिकला गेलो होतो. सव्वादोन वाजता प्रमाणपत्र मिळाले. ते ई-मेलद्वारे पाठवले. प्रमाणपत्र मेलमधून काढून सादर करण्याबाबत सुरेश भोसले यांना कळवले, तेव्हा पत्नीने झालेला प्रकार आपल्याला मोबाइलवरून सांगितला. तहसील कार्यालयामध्ये अमोल जाधव व इतरांनी म्जातीवाचक अपमान केला. त्यामुळे विष घेण्याशिवाय पत्नीला पर्याय नव्हता. याबाबत कारवाईसाठी पोलिसांकडे गेलो, असता तेथेही गुंडांनी हाकलून दिले. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी केली.