आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या सुटून माजी पं. स. सदस्याचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - रिव्हॉल्व्हरचे मॅगेझिन काढत असताना त्यातून सुटलेल्या दोन गोळ्या छातीत शिरून शेवगाव पंचायत समितीचे माजी सदस्य व बांधकाम व्यावसायिक रामजी साहेबराव सातपुते (50) यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शेवगाव येथील शास्त्रीनगर भागात शनिवारी मध्यरात्री दीड वाजता घडली.

सातपुते शनिवारी मध्यरात्री घरी आले. रिव्हॉल्व्हरमधील मॅगेझिन काढत असताना अचानक दोन गोळ्या सुटून त्यांच्या छातीत शिरल्या. त्यांना शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अण्णासाहेब घावटे यांनी तपासणी करून सातपुते मरण पावल्याचे सांगितले. शवचिकित्सेसाठी पार्थिव औरंगाबादला नेण्यात आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक बजरंग चौगुले तपास करीत आहेत. दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे घडला असावा, याबाबत राजकीय वतरुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.