आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता दुरुस्तीसाठी सभापतींचा ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सोलापूर, जामखेड दौंड रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून तेथून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी शनिवारी नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली उपअभियंता कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सोलापूर, जामखेड दौंडला जोडणारे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत. या रस्त्यांवर मागील सहा-सात महिन्यांपासून मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे मोटारसायकलस्वारांचे अपघात होत आहेत. ताबा सुटून मोठ्या वाहनांचेही अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकामच्या या बेजबाबदारपणामुळे अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले. जामखेड रस्त्यावर अपूर्वा अपार्टमेंटजवळ शनिवारी खड्डे चुकवण्याच्या नादात मोटारसायकलस्वारांचा अपघात होऊन तिघांना प्राण गमवावे लागले. खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत वेळोवेळी सार्वजनिक बांधकामशी संपर्क साधला, तरीही या विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही.
हे खड्डे तातडीने बुजवावेत. खड्ड्यांमुळे अपघात झाला, तर बांधकाम अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे खटले दाखल करावेत, या मागणीसाठी कार्ले यांच्या नेतृत्वाखाली उपअभियंता दालनात दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. उपअभियंता अनिल लाटणे यांनी २० जुलैपूर्वी खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले. यावेळी विलास शेडाळे, दीपक बेरड, राजू भगत, विशाल ससे, जिवा लगड, किशोर बेरड, उमेश बेरड, संजय बेरड, नारायण बेरड, भाऊ बेरड, साईनाथ बेरड आदी उपस्थित होते