आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pandit Chaurasia Flute Play Tomorrow At Nandanvan Lawn

पंडित चौरसिया यांचे बासरीवादन उद्या रंगणार नंदनवन लॉनमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दैनिक दिव्य मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन पंडित आनंद भाटे यांच्या गायनाची मैफल माउली संकुलऐवजी आता नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे गुरुवारी सायंकाळी रंगणार आहे. वाचकांचा उदंड प्रतिसादामुळे कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्यात आले.

"दिव्य मराठी', पुण्यातील व्हायोलिन अकादमी नगर येथील सरगमप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी (७ जानेवारी) सायंकाळी सहा वाजता स्वरझंकार संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात जागतिक कीर्तीचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन, तर पंडित आनंद भाटे यांच्या गायनाची विजय घाटे यांच्या तबलावादनाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. रसिकांनी प्रवेशिकांसाठी दैनिक दिव्य मराठी कार्यालयात एकच गर्दी केली. दुपारपर्यंत सर्वच प्रवेशिका संपल्या होत्या. रसिकांचा उदंड प्रतिसाद प्रवेशिकांची मागणी लक्षात घेऊन कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

चाैथ्या वर्धापन दिनानिमित्त रसिकांसाठी चौरसिया यांचे बासरीवादन भाटे यांच्या गायनाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. याचा नगरकर रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दैनिक दिव्य मराठी ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी केले आहे. गेल्यावर्षी वर्धापन दिनानिमित्त जागतिक कीर्तीचे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाचा कार्यक्रम शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता.