आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pandit Hariprasad Chaurasiya Play Flute On Thursday

पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे गुरुवारी माउली सभागृहात बासरीवादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दैनिक‘दिव्य मराठी’च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 'दिव्य मराठी', पुण्यातील व्हायोलिन अकादमी नगर येथील सरगमप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी (७ जानेवारी) सायंकाळी वाजता सावेडीतील माउली सभागृहात स्वरझंकार संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन आणि पं. आनंद भाटे यांच्या गायनाची मेजवानी नगरच्या रसिकांना मिळणार आहे.
चार वर्षांपूर्वी सुरू झालेले "दिव्य मराठी' हे नगरकर वाचकांच्या पसंतीला उतरलेले शहरातील अव्वल दैनिक ठरले आहे. वर्धापन दिन साजरा करताना नगरकरांना नेहमीच वेगळा अनुभव देण्याची परंपरा अखंडित ठेवत चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नगरकरांसाठी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक कीर्तीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन किराणा घराण्यातील पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे यांच्या गायनाची मेजवानी रसिकांना वर्धापन दिनानिमित्त मिळणार आहे. गेल्यावर्षी वर्धापन दिनानिमित्त जागतिक कीर्तीचे संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाचा कार्यक्रम शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नगरकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

पुण्यातील व्हायोलिन अकादमी भारतीय अभिजात संगीताच्या प्रचार प्रसार कार्यात कार्यरत आहे. स्वरझंकारच्या माध्यमातून त्यांचे कार्य लोकप्रिय रसिकप्रिय झाले आहे. नगरसह अकोला, अमरावती, जळगाव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा विविध ठिकाणी स्वरझंकारने रसिकांना मंत्रमुग्ध केले. युवा पिढीत अभिजात शास्त्रीय संगीताची गोडी आवड निर्माण व्हावी भविष्यात कानसेन घडावेत, या उद्देशाने म्युझिक अॅप्रिसिएशन कोर्सची निर्मिती केली गेली आहे.

प्रवेशिका मर्यादित; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
हाकार्यक्रम विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका दैनिक ‘दिव्य मराठी’च्या तारकपूर रस्त्यावरील कार्यालयात सर्जेपुरा येथील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, याप्रमाणे या प्रवेशिका वितरित करण्यात येणार आहेत. रसिकांनी प्रवेशिका घेऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन 'दिव्य मराठी' ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी केले आहे.