आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकर रसिक अनुभवणार पंडित शिवकुमार शर्मा यांची मैफल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - "दिव्यमराठी'च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील व्हायोलिन अकादमी दिव्य मराठीच्या संयुक्त िवद्यमाने शनिवारी (२० डिसेंबर) नगरकरांना जागतिक कीर्तीचे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. पंडित शिवकुमार शर्मा यानिमित्त प्रथमच नगरमध्ये येत आहेत.
व्हायोलिन अकादमीतर्फे दरवर्षी ‘स्वरझंकार’ हा कार्यक्रम सादर केला जातो. त्या अंतर्गत मुंबई, पुणे वगळता इतर छोट्या शहरांत जगविख्यात कलाकारांच्या मैफलींचे आयोजन केले जाते. या वर्षी त्याचे उद््घाटन नगरमध्ये होणार असल्याची माहिती प्रसिद्ध व्हायोलिनवादक व्हायोलिन अ‍ॅकॅडमीचे प्रमुख अतुलकुमार उपाध्ये यांनी दिली. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाला आजच्या पिढीतील आघाडीचे तबलावादक पं. योगेश समसी तबल्यावर साथ करणार आहेत.
पंडित शिवकुमार शर्मा हे आजच्या संगीत विश्वातील ऋषितूल्य व्यक्तिमत्त्व आहे. शततारी वीणा म्हणजे संतूर. पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरला साऱ्या विश्वात लोकप्रियता लोकमान्यता मिळवून दिली. पंडितजींनी आधी निष्णात तबलावादक म्हणून नावलौकिक मिळवला. संतूर हे वाद्य मूळचे काश्मीरचे. पंडितजीही मूळचे तेथीलच. पहाडी वातावरणातून उगम पावलेल्या वाजवण्यास अतिशय अवघड असलेल्या या वाद्यावर पंडितजींचे प्रभुत्व आहे. सहजसुंदर आलापी, रागातील सुरांचा तालाशी सुरेख संवाद साधणारे त्यांचे वादन शास्त्रीय संगीत समजणाऱ्या समजणाऱ्या रसिकांनाही स्वर्गीय अनुभव देते. शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान केला आहे. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबर ‘शिवहरी’नावाने त्यांनी अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. चांदनी, विजय, डर ही त्यातील काही वानगीदाखल नावे.
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करत असलेल्या पुण्यातील व्हायोलिन अकादमी त्यांच्या या कार्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सहयोग करीत असलेल्या ‘दिव्य मराठी’तर्फे हा कार्यक्रम िवनामूल्य ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमास पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स, िरस्का एलइडी, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आदींचे सहकार्य लाभले आहे. नगरकर रसिकांसाठी ही मोठी मेजवानी ठरेल.