आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारुप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांसह निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पांगरमल बनावट दारुप्रकरणी आरोग्य संचालनालयाने शासकीय रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांच्यासह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. 


जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात पांगरमल येथे विषारी दारुमुळे दहाजणांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयाच्या उपाहारगृहातून बनावट दारु वितरित झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी २० जणांविरुध्द गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली होती. गुप्तचर विभागाने तपास करुन आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहा, तर पोलिस विभागातील चाैघांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, ज्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दारु वितरित झाली, त्या शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. 


तीन दिवसांपूर्वी आरोग्य राज्यमंत्री दीपक सावंत यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देत कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. मंगळवारी आरोग्य उपसंचालकांनी रुग्णालयाला भेट देऊन अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. या भेटींनंतर आरोग्य संचालनालयाने तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनवणे यांच्यासह अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पी. एस. कांबळे, सध्याचे प्रशासकीय अधिकारी रमेश माने तत्कालीन प्रशासकीय अधिकारी डॉ. संजय राठोड निलंबित केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...