आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडेंचे स्वागत, पण रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- संघर्षयात्रेच्या समारोपासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे या सक्कर चौकातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होत्या. गुरुवारी सकाळी चौंडीकडे निघालेल्या मुंडे यांचे वाहन सक्कर चौकात शिवसैनिकांनी अडवले. वाहन अडवल्यानंतर शहर शिवसेनेतर्फे आमदार अनिल राठोड यांनी त्यांचा सत्कार केला.
आमदार राठोड यांनी फोन केला असता मुंडे यांनी त्यांना पॅलेसमध्ये बोलावले. त्यावर आमदार म्हणाले, ताई, तुम्ही ज्या पॅलेसमध्ये उतरला आहात, त्या पॅलेसचे मालक खुनाच्या गुन्ह्याखाली अटकेत आहेत त्यांच्या मुलांना जिल्हाबंदी आहे. त्यामुळे मी तुमचे स्वागत करायला तेथे येऊ शकत नाही. अखेर मुंडे चौकात आल्यानंतर त्यांचा सत्कार राठोड यांनी केला. जिल्‍हा भाजपतर्फे मुंडे यांच्या मुक्कामासाठी दुसरे हॉटेल बुक केले होते. मात्र, रात्री अचानक त्यांच्या मुक्कामाची जागा बदलली. नगरमधील भाजप शिवसेनेमधील मतभेद पुन्हा यातून स्पष्ट झाले.
पुढील स्‍लाइडवर पाहा छायाचित्रे..