आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडाचा राजकीय वापर नाही : पंकजा मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - भगवानगडाची व्याप्ती मोठी आहे. गडावर भक्त म्हणून कार्यक्रमासाठी आपण येतो. राजकारणाचा संबंध नाही, जर काही झाले असेल, तो विषय पोलिसांचा आहे. गडाचा राजकीय वापर होत नाही. सर्वपक्षीय अनेक नेते येऊन गेले. त्यामुळे राजकीय टीकेला अर्थ नाही. कोणाला बोलवावे हे गडाने ठरवावे, असे मत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

भगवानगडावर सोमवारी घडलेल्या प्रकारानंतर पंकजा मंगळवारी काय बोलतात. हे ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पण पंकजा यांनी त्यावर भाष्य टाळले. पत्रकारांनी याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, सोमवारी घडलेल्या प्रकाराची कल्पना नाही. मी कॅबिनेट मीटिंगमध्ये होते. भगवानगड असताना गोपीनाथ गड का, याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, गोपीनाथगड वैचारिक चळवळीचे प्रतिनिधित्व करणार आहे. भगवानगड धार्मिक गड आहे. दोघांची तुलना करणे चुकीचे आहे. सोमवारी ज्यांनी गडावर टीका केली. (धनंजय मुंडे) त्यावर ते उत्तर देतील. माझ्या समर्थकांनी असे कृत्य केले असे म्हणणे चुकीचे आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रश्न नाही. तसे योग्य वाटत असेल, तर त्याचा निर्णय गृहमंत्री घेतील. कोणावरही व कोणतेही राजकीय भाष्य मला करायचे नाही.

ऊसतोडणी मजुराच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची जबाबदारी शासनाची आहे. सर्वाधिक कर साखर उद्योग देतो. ऊस उत्पादक, वाहतूकदार, कारखानदार, राज्य शासन व केंद्र शासनावर संयुक्त जबाबदारी देऊन तोडणी कामगारांचे कल्याण व्हावे, मजुरांना कार्यस्थळावर सुविधा द्यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. यावेळी महादेव जानकर यांचेही भाषण झाले. भगवानगडाच्या विकासाचे स्वप्न साकार करू. प्रकाश जावडेकर यांनी गडासाठी वनविभागाच्या जागेचा प्रश्न सोडवला, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

गाेपीनाथ मुंडे माझे राजकीय दैवत असून मुख्यमंत्र्यांचा मी लाडका व अर्थमंत्र्यांच्या कुलपाची अचूक चावी मला जमणार असून नगर व बीड जिल्ह्यातील विविध पाणी योजनांसाठी दाेनशे कोटी रुपये देऊ, असे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
ऐतिहासिक गर्दी
गडाच्या परिसरात वाहनांच्या गर्दीमुळे सुमारे तीन तास वाहतूक कोंडी झाली. मुख्य कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू झाला. तोपर्यंत लाखो स्त्री - पुरुष उन्हात बसून होते. औरंगाबाद, मुंबई, बीडसह जिल्ह्यंाच्या सर्व तालुक्यांतून प्रचंड बंदोबस्त, कमांडो, राखीव दल तैनात होते. गडाच्या इतिहासात एवढी ऐतिहासिक गर्दी कधी झाली नव्हती. दोन किलोमीटर परिघामध्ये पाय ठेवायला कुठे जागा नव्हती.