आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजांच्या भावनिक भाषणाने अनेकांचे डोळे पाणावले, गोपीनाथ मुंडेंच्या शैलीत केली भाषणाला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - सुमारेअडीच वर्षांपूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने संपूर्ण राज्य सुन्न झाले होते. आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर जशी परिस्थिती व्हावी, तसे वातावरण घराघरांत झाले होते. पंकजा यांना दसरा मेळाव्यात बोलण्यास विरोध झाल्यानंतर प्रत्येकाला ताईंना बोलता येणार नाही ही खंत होती. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक मंगळवारी गडावर आले. पंकजा यांनी मुंडेसाहेब ज्या पध्दतीने भाषणाची सुरूवात करत तशाच पध्दतीचा आवाज काढत पित्याच्या स्मृतीला उजाळा दिला. त्यांचे भाषण ऐकताना लाखोंच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. काहींनी गडाच्या महंताच्या विरोधात अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन निषेधाच्या घोषणा दिल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने काही तरुणांना भावना आवरणे अशक्य झाले.
'तुम्हाला मी दिसत नसलो, तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे', अशा वाक्याने गोपीनाथ मंुडे यांनी भाषणाला सुरूवात करताच टाळ्या आणि शिट्या ठरलेल्या असायच्या. मंगळवारीही मोठा जनसमुदाय उपस्थित होता. बसण्यास अपुरी खाचखळग्याची जागा यामुळे अनेकांना पंकजा दिसत नव्हत्या. त्यांना पाहण्यासाठी शिट्या वाजवल्या जात होत्या. पंकजा यांनीदेखील मुंडेसाहेबांच्या नेहमीच्याच स्टाईलने भाषणाची सुरूवात करत लोकनेत्यांची आठवण करुन दिली. प्रचंड प्रेम करणारा समाज, लाखोंच्या संख्येने आपले भाषण ऐकण्यासाठी उन्हातान्हात सण-वार विसरुन येतो आहे, याचा अभिमान लोकनेत्यांना जेवढा वाटायचा, तेवढाच पंकजा यांनादेखील वाटत असल्याची प्रचिती त्यांच्या भाषणातून आली.

पंकजा यांनी विराट जनसमुहाला संबोधित करताना विविध वक्त्यांकडून ओबीसीचा नेता असा होणारा उल्लेख नम्रपणे स्वीकारत केलेले खोचक भाषण स्वपक्षीयांसह विरोधकांना मारलेल्या कोपरखळ्या परिपक्व राजकारणी म्हणून अधोरेखीत झाल्या. अशा प्रत्येक मुद्द्याला टाळ्या, शिट्यांची दाद देत कार्यकर्ते भाविकांनी पंकजामध्ये आपल्या लाडक्या लोकनेत्याला पाहिले. तरुणांना मुंडे यांच्या आठवणीने रडताना पाहून रखरखत्या उन्हातही तहानभूक हरखून बसलेला समाज आणखी भावनावश झाला. दुपारी चारपर्यंत सभा चालली. नेतृत्व करावे तर मुंडे यांच्यासारखे प्रेम करावे तर त्यांच्या अनुयायांसारखे याची प्रचिती सर्वांना आली. भाषणाच्या शेवटी पंकजा यांचाही कंठ काही वेळा दाटून आला होता.
पुढील स्लाईडवर पाहा, पंकजा मुंडेंच्या सभेचे इतर फोटो
बातम्या आणखी आहेत...